Goat Milk : प्रक्रियेसाठी शेळीचे दूध फायदेशीर...

Goat Millk
Goat MillkAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद जेऊघाले, डॉ. अनिता चप्पलवार

जागतिक पातळीवर शेळीच्या दुधाची बाजारपेठ (Goat Milk Market) वाढत आहे. शेळीच्या दुधात (Goat Milk) निरोगी वाढीसाठी आवश्यक सर्वच घटक असतात, म्हणून या दुधाला संपूर्ण आहार म्हणून ओळखले जाते. या दुधामध्ये कर्बोदके, चरबी, प्रथिने, संपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. गायीच्या दुधाच्या (Cow Milk) तुलनेत, शेळीच्या दुधात पचनशक्ती, बफर क्षमता आणि औषधी गुणधर्म जास्त असतात.

चौकट ः शेळीच्या दुधातील पोषणमूल्ये

पोषक घटक --- शेळीचे दूध (टक्के) --- गाईचे दूध (टक्के)

फॅट---३.८०---३.६७

एसएनएफ---८.६८---९.०२

लॅक्टोज---४.०८---४.७८

एकूण नायट्रोजन---३.३३---३.४२

एकूण प्रथिने---२.९०---३.२३

केसीन---२.४७---२.६३

जीवनसत्त्व अ (IU/gm फॅट) ---३९.०---२१.०

जीवनसत्त्व बी १ ( ग्रॅम/१०० मिलि) ---६८.०---४५.०

जीवनसत्त्व क (मिलिग्रॅम ॲस्कॉर्बिक ॲसिड प्रति १०० मिलि)---२.००---२.००

Goat Millk
Goat Farming : गाभण शेळ्यांना कसे जपाल?

जीवनसत्त्वांची उपलब्धता -

शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा नैसर्गिक जीवनसत्त्व उपलब्धता जास्त आहेत. शेळीचे दूध हे गाई व म्हशींच्या दुधापेक्षा पांढरे असते कारण शेळ्या, दुधातील सर्व कॅरोटीन जीवनसत्त्व -अ मध्ये रूपांतरित करतात. शेळीचे दूध हे जीवनसत्त्व ‘अ’ रिबोफ्लेविन, थायामिन, नियासिन, जीवनसत्त्व-ड आणि जीवनसत्त्व- ई चा चांगला स्रोत आहे. शेळीच्या दुधात जीवनसत्त्व- अ चे प्रमाण जवळ जवळ मानवी दुधाच्या या जीवनसत्वावर रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते. शेळीच्या दुधात पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्त्व क गाईच्या दुधापेक्षा जास्त असून, या जीवनसत्त्वामधील गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी उपयुक्त आहे.

शेळी, गाईच्या दुधातील जीवनसत्त्व (प्रति १०० ग्रॅम)

जीवनसत्त्व --- शेळीचे दूध--- गाईचे दूध

जीवनसत्त्व -अ (IU)---१८५---१२६

जीवनसत्त्व - ड (IU)---२.३---२.०

थायमिन (मिलिग्रॅम)---०.०६८---०.०४५

रिबोफ्लेविन (मिलिग्रॅम)---०.२१---०.१६

नायसिन (मिलिग्रॅम)---०.२७---०.०८

पेंटाथेनिक ॲसिड (मिलिग्रॅम)---०.३१---०.३२

जीवनसत्त्व बी-६ (मिलिग्रॅम)---०.०४६---०.०४२

फॉलिक ॲसिड (ग्रॅम)---१.०---५.०

बायोटिन (ग्रॅम)---१.५---२.०

जीवनसत्त्व ब १२ (ग्रॅम)---०.०६५---०.३५७

जीवनसत्त्व सी (ग्रॅम)---१.२९---०.९४

Goat Millk
Goat Farming : गाभण शेळ्यांना कसे जपाल?

विविध उत्पादने ः

१. लोणी : शेळीच्या दुधापासून बनविलेल्या लोण्यात आरोग्यदायी घटक मोठ्या प्रमाणात असतात.

२. दही : हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीथ्रॉम्बोटिक, अँटी-ऑक्सिडेटिव्ह आणि अँटी-एथेरोजेनिक आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. आतड्यांचे आजार, कर्करोग आणि ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.

३. आइस्क्रीम : शेळीच्या दुधापासून चांगल्या स्वादाचे आइस्क्रीम तयार करता येते.

४. चीज : चीज हे दुधातील केसीन प्रोटीन गोठवून बनवले जाते. शेळीचे दूध वापरून फेटा, कप्रिनो, परमेसन, गौडा आणि ब्ल्यू चीज

बनवले जाते.

५. पावडर : दूध पावडर जास्त काळ टिकते, विविध प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे.

६. मिठाई : शेळीच्या दुधापासून ‘काजेटा’ नावाच्या मेक्सिकन कँडी बनवल्या जातात. कुकीज बनवण्यासाठी दूध वापरले जाते.

ड) सौंदर्य प्रसादने : बाजारात शेळीच्या दुधापासून बनवलेले स्कीन मॉइश्‍चरायझर्स, बॉडीलोशन, ब्यूटीक्रीम्स, केसांचे तेल आणि साबण उपलब्ध आहेत.

दूध आणि प्रक्रिया पदार्थांची विक्री ः

शेळीच्या दुधाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत आणि व्यावसायिक स्तरावर देखील अतिरिक्त पौष्टिक फायदे आहेत. शेळीच्या दुधापासून बनवलेल्या उत्पादनांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये बाजारात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

१) शेळीच्या दुधातील पोषण आणि आरोग्यदायी फायद्यांबद्दल जागरूकता वाढवावी.

२) दूध उत्पादनासाठी स्थानिक जातींवर भर द्या. स्वच्छता ठेवावी.

३) प्रक्रिया उत्पादनाला चव, पोत आणि उच्च-गुणवत्ता असावी.

४) योग्य किंमतीसह आकर्षक पॅकेजिंगमध्ये उत्पादनांच्या विक्रीची गरज.

संपर्क ः

डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९

डॉ. आनंद जेऊघाले, ९३०७९८६६०३,

(पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com