
सोलापूर ः सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील कृषी प्रदर्शनामध्ये (Sidhheshwar Agri Exhibition) यंदा शेतीविषयक विविध माहिती आणि नवनव्या तंत्रज्ञानाच्या दालनांनी शेतकऱ्यांचे आकर्षण वाढविले आहे. पण त्याहूनही अधिक केवळ पाच वर्षे वयाचा आणि दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा (Gajendra Bull Buffalo) सर्वांचे आकर्षण ठरला आहे. शेतकऱ्यांची त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. येत्या सोमवार (ता.२) पर्यंत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहण्यासाठी खुले असेल.
सोलापुरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुंगसळी येथील ज्ञानेश्वर नाईक यांच्या मालकीचा हा रेडा आहे. दररोज पाच किलो सफरचंद आणि २० लिटर दूध पिऊन गजेंद्र हा रेडा तंदुरुस्त बनलेला आहे. त्याशिवाय गव्हाची पेंड, उसाचे वाढेही खातो. दिवसभरात त्याच्यावर सुमारे दोन हजाराचा खर्च होतो.
प्रदर्शनस्थळी पायाला घुंगरु, शिंगांना लिंबू, पाठीवर गोंडा अशा आकर्षक पद्धतीने त्याला सजवण्यात आले आहे. त्यामुळे पटकन तो सर्वांचे लक्ष वेधतो. या रेड्याशिवाय शेजबाभूळगाव (ता.मोहोळ) येथील शशिकांत पुदे यांच्याकडील खिलारही सर्वांचे लक्ष वेधते. जातीवंत खिलारला सर्वाधिक मागणी असते. त्याचीही माहिती शेतकरी घेत आहेत.
त्याची वैशिष्ट्ये विचारत आहेत. त्याशिवाय प्रदर्शनात सुमारे २०० हून अधिक स्टॅाल्स उभारले आहेत. ज्वारीवर आधारित प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक उद्योग हेही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या प्रदर्शनात शेतीविषयक नवनवी माहिती, तंत्रज्ञानाची दालने उभी केली आहेत. कृषी विषयक विविध व्याख्यानेही ठेवली आहेत. - गुरुराज माळगे, अध्यक्ष, कृषी प्रदर्शन समिती.
गजेंद्र आणि बाहुबली असे दोन रेडे आपल्याकडे आहेत. हरियानाहून आपण त्यांना आणले आहे. आतापर्यंत गजेंद्र या रेड्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या दहा प्रदर्शनामध्ये नेण्यात आले. सव्वाकोटी रुपयांपर्यंत त्याच्यावर बोली लागली आहे. पण दोन कोटीच्या पुढे बोली लागली, तरच विकणार आहे.
- ज्ञानेश्वर नाईक, गजेंद्र रेड्याचे मालक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.