Fodder Shortage : नगरमध्ये पशुपालकांवर येणार चाराटंचाईचे संकट

Animal Fodder Issue : यंदा पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे. यंदा पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती जाणवू लागली आहे. यंदा पशुपालकांना चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात वर्षभरात एक कोटी २० लाख टनांपर्यंत चारा लागतो.

यंदा खरीप, रब्बी हंगामांसह सर्व बाजूंनी एक कोटी ७० लाख टन चाऱ्याचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र टंचाई परिस्थितीमुळे १ कोटी टनापर्यंत चारा उपलब्ध होईल. त्यामुळे किमान दोन महिने चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात २ लाख ७६ हजार ११५ लहान व १३ लाख २३ हजार ५४३ मोठ्या गाई-म्हशी आहेत. १५ लाख ७९ हजार ८०३ शेळ्या, मेंढ्या आहेत. शिवाय अन्य पशुधनाचा विचार केला, तर दर महिन्याला साडेआठ लाख टनांपर्यंत चारा लागतो. बहुतांश भागात या वर्षी पुरेसा पाऊस नाही.

धरणातही पुरेसा पाणीसाठा नाही. धरण कार्यक्षेत्रातील काही गावे सोडली, तर बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. खरिपात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. रब्बीची तर पेरणीच झाली नाही. त्यामुळे चारा स्थिती गंभीर आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : चाराटंचाईमुळे ऊसतोड; कारखान्यांचा मात्र हिरमोड

मक्याचे हेक्टरी ५५ टन, बाजरीचे ४५ टन, ज्वारीचे ५० टन, कडवळाचे ५० टन, ल्युसर्न घासाचे ११० टन, नेपियर घासाचे १२५ टन, इतर चारा पिकांचे सरासरी ४० टन हेक्टरी उत्पादन निघण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा खरीप, रब्बी हंगामासह अन्य पिकांतून वर्षभरात एक कोटी टनापर्यंत चारा मिळण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्याला एक कोटी २० लाख टन चारा लागतो. उपलब्ध चाऱ्यानुसार आतापर्यंत सात महिन्यांचा कालावधी गेला आहे. अजून सुमारे सात ते आठ महिने चारा टंचाईशी सामना करावा लागेल. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसारच पशुसंवर्धन विभाग आकडे संकलित करत आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : धुळे जिल्ह्यातील चारा, मुरघास अन्यत्र वाहतुकीस प्रतिबंध

उसाचा होणार अधिक वापर

नगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांसह ज्या भागात पाणी आहे, त्या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. इतरत्र चारा, शेती, पिण्याच्या पाण्याच्या गंभीर अडचणी आहेत. कोरडवाहू, दुष्काळी भागातील पशुधन जगवणे अवघड होणार आहे.

...असा होईल अंदाजे चारा उपलब्ध (टन)

खरीप बाजरी ३७ लाख ३६ हजार ४४४

खरीप मका ४७ लाख ४३ हजार १४५

खरीप कडवळ ७ लाख ९४ हजार ९५०

रब्बी मका ५ लाख ८१५

रब्बी ज्वारी ६३ लाख टन

ल्युसर्न घास १० लाख ७६ हजार ६८०

नेपियर ग्रास ९ लाख ७५ हजार ६७५

इतर चारापिके १ लाख ५५ हजार १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com