Solapur District Milk Union : सोलापूर जिल्हा दूध संघ अक्कलकोटला शीतकरण केंद्र उभारणार

District Milk Union : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या संघाला सावरण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या अक्कलकोट, शेटफळ आणि मुंबईतील संघाच्या मालमत्ता विक्री करण्याचे आम्ही ठरवले आहे.
Solapur District Milk Union
Solapur District Milk UnionAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा दूध संघाने अक्कलकोट येथील मालमत्ता विक्री करण्याऐवजी त्या ठिकाणी जिल्हा दूध संघाचे शीतकरण प्रकल्प उभा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

श्री. शिंदे म्हणाले, की आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या संघाला सावरण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या अक्कलकोट, शेटफळ आणि मुंबईतील संघाच्या मालमत्ता विक्री करण्याचे आम्ही ठरवले आहे. पण अक्कलकोट येथील मालमत्तेबाबत फेरविचार झाला आहे.

ती विकण्याऐवजी तिथे शीतकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या तालुक्यातील दूध संकलित करुन ते दूध संघाच्या केगाव येथील प्रकल्पामध्ये आणले जाते. पण यामध्ये जाणारा वेळ आणि वाहतूक खर्च विचारात घेता, ते सोईचे नाही.

Solapur District Milk Union
Milk Adulteration : दूध संकलन केंद्रावरील १२ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

त्यामुळे अक्कलकोट येथे १ हेक्टर १४ आर एवढी स्वतःची जागा आहे. याच जागेवर शीतकरण केंद्र सुरु केल्यास वेळ वाचेल, वाहतूकीच्या खर्चात बचत होईलच, पण दूधाची गुणवत्ताही चांगली मिळेल. शिवाय अक्कलकोट तालुक्यातील संकलन वाढण्यासही हातभार लागेल, असा आमचा विचार आहे, असे ते म्हणाले.

मुंबई, शेटफळमधील जागा विकणार

जिल्हा दूध संघाची मुंबई येथे १०१६.४७ चौरसमीटर एवढी जागा आहे. ही जागा विक्रीसाठी दहावेळा प्रक्रिया राबवण्यात आली. पण ग्राहक मिळालेला नाही. या जागेचे मूल्यांकन जास्त होत असावे, असा अंदाज आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याचे मूल्यांकन ठरवण्यात आले आहे.

त्याला शासकीय मान्यता मिळाल्यानंतर ही जागा विक्री होईल. तसेच शेटफळ (ता.मोहोळ) येथेही दोन हेक्टर २ आर एवढी जागा आहे. ही जागाही विक्री केली जाणार आहे. या जागांच्या विक्रीनंतर संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हातभार लागणार आहे. आम्ही त्यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com