Maha Pashudhan Expo 2023 : माळसोन्नातील लाल कंधारी वासराला प्रथम पारितोषिक

‘महा पशुधन एक्स्पो’च्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन अनंत लाड यांचा सत्कार करण्यात आला.
Maha Pashudha Expo 2023
Maha Pashudha Expo 2023Agrowon

Maha Pashudhan Expo 2023 Ahmednagar : शिर्डी (जि. नगर) येथील ‘महा पशुधन एक्स्पो २०२३’ मध्ये माळसोन्ना (जि. परभणी) येथील अनंत लाड यांच्या लाल कंधारी (Red Kandhari) प्रजातीच्या वासराला (गोऱ्हा) प्रथम पारितोषिक मिळाले, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या (Animal Husbandry Department) सूत्रांनी दिली.

‘महा पशुधन एक्स्पो’च्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन अनंत लाड यांचा सत्कार करण्यात आला.

Maha Pashudha Expo 2023
Maha Pashudhan Expo 2023 : पशुधन प्रदर्शनात विविध जातींचे पशुधन पाहण्याची संधी

या वेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आदी उपस्थित होते.

Maha Pashudha Expo 2023
Maha Pashudhan Expo 2023 : मुख्यमंत्र्यांनाही पडली १२ कोटींच्या रेड्याची भुरळ

देशी गोवंशाच्या लाल कंधारी प्रजातींचे संवर्धन करणारे गाव म्हणून माळसोन्नाची ओळख आहे. शिर्डी येथील ‘महा पशुधन एक्सो’मध्ये या ठिकाणचे शेतकरी पशुधनासह सहभागी झाले होते.

जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, डॉ. पी. आर. पाटील आदींसह शेतकरी, पशुपालकांनी लाड यांचे अभिनंदन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com