Maha Pashudhan Expo 2023 : मुख्यमंत्र्यांनाही पडली १२ कोटींच्या रेड्याची भुरळ

तब्बल १२ कोटी रूपये किंमत असलेला हा रेडा सर्वच पशुपालक आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
Mah Pashudhan Expo 2023
Mah Pashudhan Expo 2023 Agrowon
Published on
Updated on

Maha Pashudhan Expo 2023 पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) शिर्डी येथे आयोजित केलेल्या महापशुधन एक्स्पो २०२३ ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी (ता. २६) भेट दिली.

देशभरातील विविध जातींचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले आहे. मात्र, हरियाणाचा मुऱ्हा जातीचा रेडा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनाही या रेड्याची भुरळ पडली.

तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोमध्ये देशभरातून पशुधन आले आहे. यात तब्बल १२ कोटी रूपये किंमत असलेला हा रेडा सर्वच पशुपालक आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

मुख्यमंत्र्यानी आपल्या भाषणातूनही या रेड्याचा उल्लेख केला. कार्यक्रमानंतर हा दिमाखदार रेडा पाहण्यासाठी मुख्यमंत्री खास दालनात पोहचले होते.

Mah Pashudhan Expo 2023
Livestock Breeding : पशुधन पैदास धोरणात सुधारणा हव्यात

१२ कोटींचा रेडा

मुऱ्हा जातीच्या या म्हैस वर्गातील रेड्याच्या मालकाचे नाव गुर्तियार सिंग आहे. हा रेडा त्यांना वर्षाला ७५ ते ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सिंग यांनी सांगितले. रेड्याच्या वीर्यातून हे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Mah Pashudhan Expo 2023
Lumpy Skin : पशुधन जगेना, शेतकऱ्यांना मदत मिळेना

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून कारभार करत आहे. आमचा कारभार शेतकरी हिताचा आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी आलो. पशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी मोठे व्यासपीठ असून यातून शेतकऱ्यांना नविन काहीतरी शिकायला मिळत आहे.

अशा प्ररदर्शनामधून वेगवेगळ्या भागातील विविध जातींच्या जनावरांची माहिती शेतकऱ्यांना मिळत असते. या एक्स्पोचा लाखो शेकऱ्यांना फायदा होईल.

राज्य सरकारने लम्पीमुक्त महाराष्ट्र करण्याचा विडा उचलला आहे. लम्पीबाबत तातडीने पाऊले उचलून हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी काम केल्याचे शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com