Animal Husbandry : शास्रीय पशुसंवर्धनातून ग्रामीण स्वयंरोजगाराच्या संधी

Self employment : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन  नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  बुधवार(ता.९) रोजी राष्ट्रीय पशुधन अभियानअंतर्गत एकदिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’ विद्यापीठात संपन्न झाली.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मानवाने  पशुपालनाचे नेमके शास्त्र समजून घेत  व्यावसायिक पशुपालनाला चालना द्यावी. त्यात व्यवसाय वाढीच्या प्रचंड संधी आहेत, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र व प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन  नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  बुधवार(ता.९) रोजी राष्ट्रीय पशुधन अभियानअंतर्गत एकदिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यशाळा’ विद्यापीठात संपन्न झाली. यावेळी प्रा.सोनवणे बोलत होते.

व्यासपीठावर नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, पशुसंवर्धन आयुक्तालयाचे  उपायुक्त डॉ.प्रशांत भड, नाशिक विभागाच्या  पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त डॉ.बी.आर.नरवाडे,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रशांत धर्माधिकारी,मुक्त विद्यापीठाच्या  कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ व प्रभारी राजाराम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. सोनवणे म्हणाले, की पृथ्वीतलावर जोपर्यंत वृक्ष, पशू व मधमाशा आहेत तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी वृक्ष, पशू व मधमाशा यांचे संवर्धन व पालनपोषण याकडे लक्ष दिले पाहिजे. पशुपालकांनी स्वतःकडे असलेले ज्ञान इतरांना देत, परस्परपूरक अनुभवातून सामुहिक प्रगती साधण्यावर त्यांनी भर दिला.

Animal Husbandry
Animal Care : गोठ्यातील गोचीड, माशा, उवा, पिसवा पळवून लावण्याचे उपाय

डॉ. गुंडे यांनी शुद्ध अनुवांशिक पशुसंगोपन व संतुलित आहार या बाबींवर काम करण्याची गरज विशद केली. डॉ.भड यांनी राष्ट्रीय पशुधन योजनेची मार्गदर्शक तत्त्वे व लाभार्थी निवडीचे निकष यांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ.नरवाडे यांनी राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत यशस्वी पशुपालकांची व्यवसायपद्धती विशद केली. यानिमिताने राष्ट्रीय पशुधन योजनांविषयीची पुस्तिका उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

Animal Husbandry
Animal Care: शेळ्यांवरील उष्णतेचा ताण आणि उपाययोजना

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. सुनील तुंबारे, डॉ. सुनील गिरणे, डॉ. दशरथ दिघे यांची विशेष उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. श्याम कडूस-पाटील यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचे समन्वयन व सूत्रसंचालन केले. डॉ.प्रशांत धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत, मंगेश व्यवहारे, डॉ.प्रकाश कदम, अर्चना देशमुख, संदीप भागवत, हर्षल काळे, अमोल पुंड, माधव माळी व ऋषिकेश पवार यांनी परिश्रम घेतले.

पशुपालक, तज्ज्ञ व पशुवैद्यकांचा सहभाग

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना माहितीबरोबरच,शेळी-मेंढी, कुक्कुट पालन व्यवसाय वाढीच्या संधी, मुरघास तंत्रज्ञान प्रक्रिया,पशुपालकांसाठी बँक अर्थसहाय्य व सुलभ कर्जप्रक्रिया इत्यादी विषयांचा उहापोह करण्यात आला.कार्यशाळेत नाशिकसह अहिल्यानगर,नंदुरबार,धुळे व जळगाव या पाच जिल्ह्यामधील राष्ट्रीय पशुधन योजनेसाठी पात्र पशुपालक तसेच विभागातील तज्ञ पशुवैद्यक  मिळून  एकूण १८० जणांनी सक्रिय सहभाग घेतला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com