Team Agrowon
नेहमी गोठा स्वच्छ ठेवावा, जेणेकरून माश्या आणि गोचीड यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल.
गोठ्यामध्ये हवा खेळती असावी, त्यामुळे जास्त दमटपणा राहणार नाही.
गोठ्यामधील शेण नियमित स्वच्छ करावे. बंदिस्त गोठ्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त गायी ठेवू नयेत.
गोमाशीवर नियंत्रण करण्यासाठी गोठ्याभोवती ‘फ्लाय रेपेलंट’ जाळीचा वापर करावा. परजीवी नियंत्रणाच्या औषधाची गोठ्यामध्ये फवारणी करावी. गोठ्यामध्ये प्रामुख्याने भिंती, पृष्ठभागावरील भेगा, दावणीच्या आतील बाजू आणि आजूबाजूचा परिसर फवारून घ्यावा.
संध्याकाळच्यावेळी गोठ्यामध्ये कडूलिंबाच्या पानांचा धूर करावा, जेणेकरून गोमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल.
कडूलिंबाच्या पानांचा रस करून गायींच्या शरीरावर लावावा, त्यामुळे गोचीड निर्मूलन होते. बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी आवश्यक औषधे योग्य त्या प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गाईच्या अंगावर आणि गोठ्यात फवारावी.
गाईंना संतुलित आणि पौष्टिक आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. निरोगी गाईंना परजीवींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते.
Tamrind Cultivation : बांधावरची गावरान चिंच देते फायदाच फायदा