Goat Farming : जातिवंत पैदाशीवर भर

Goat Care : शेळ्यांच्या संगोपन त्यांची योग्य काळजी आणि शेळ्यांच्या पैदाशीवर भर कसा देता येईल, याबद्दलची माहिती या लेखातून जाणून घेऊयात.
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry : मुख्यतः हिवाळ्यामध्ये शेळ्यांना एफएमडी म्हणजेच लाळ्या खुरकूत या आजाराकरिता लसीकरण केले जाते. आमच्या कळपामध्ये हे लसीकरण नुकतेच केले आहे. लसीकरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाते.

कुठलीही लस देत असताना तिची ‘कोल्ड चेन’ ही जपणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. म्हणजेच आइस बॉक्स किंवा बर्फात टाकून किंवा थर्मासचा वापर करून ती लस आणावी लागते. आम्ही लसीकरणासाठी आणलेली लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानामध्ये कशी राहील यासाठी काळजी घेतो.

लसीकरणाचे नियोजन करीत असताना शेळ्यांना सर्वप्रथम जंताचे औषध पाजण्यात आले. हे जंतनाशक औषध मुख्यतः उपाशीपोटी म्हणजेच सकाळी शेळ्यांना दिले जाते. हे जंताचे औषध पाजल्यामुळे शेळ्यांच्या पोटातील सर्व जंत मरून जातात. शेळ्यांनी खाल्लेले अन्न पचते. शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.

त्यानंतर पुढील दहा दिवस शेळ्यांना लिव्हर टॉनिकसुद्धा पाजतो. शेळ्यांचे लिव्हर मजबूत झाले म्हणजेच चारा खाण्याचे प्रमाण वाढते. खाल्लेला चारा चांगल्या पद्धतीने पचन होतो. अशी दहा दिवस लिव्हर टॉनिक पाजल्यानंतर आपण शेळींना लसीकरण करतो. म्हणजेच ११ व्या दिवशी त्या शेळीला लसीकरणाचे नियोजन केले जाते.

Goat Farming
Goat Farming : आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला शेळीपालनातून रोजगार

लस देताना घेत असलेली काळजी

वातावरणात थंडावा असताना सकाळी किंवा संध्याकाळी लसीकरण केले जाते.

एकच सुई अनेक शेळ्यांच्या लसीकरणाला वापरल्यास शेळ्यांच्या अंगावर गाठी येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आम्ही प्रत्येक शेळीसाठी वेगळी सुई (नीडल) वापरतो. यामुळे शेळ्यांना लसीकरणानंतर गाठ होण्याचा धोका टळतो.

Goat Farming
Goat Farming : शेळी,बोकडांची पैदाशीसाठी निवड

लसीकरणानंतर शेळ्यांना लुसलुशीत हिरवा चारा दिला जातो. त्यात यासाठी लुसर्ण घास, दशरथ मका, नेपियर अशी प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले गवत शेळ्यांना जागेवरच दिले. सोबत पशुखाद्यही दिले.

लसीकरणानंतर पुन्हा पुढील दहा दिवस लिव्हर टॉनिक त्या शेळ्यांना दिले जाते. म्हणजेच लसीकरणाच्या दहा दिवसांनी व लसीकरण केल्यानंतर पुन्हा दहा दिवस असे आपण एकूण २० दिवस शेळ्यांना लिव्हर टॉनिक देत असतो.

शेळ्या चरायला नेल्या जात असतील, तर लसीकरणानंतर किमान पुढचे आठ ते दहा दिवस तरी शेळ्यांना फार जास्त लांब चरायला नेऊ नये. लसीकरण केल्यानंतर काही दिवस शेळ्यांना थकवा येऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे असलेला हिरवा चारा आम्ही शेळ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात जागेवर देतो. लसीची रोगप्रतिकारक शक्ती त्या शेळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढविण्यास मदत होते. अशा पद्धतीचे आम्ही नियोजन करतो.

९५२७१५६७४७ (शब्दांकन : गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com