Goat Farming : शेळी,बोकडांची पैदाशीसाठी निवड

Goat Rearing : शेळी निरोगी असावी. कोणतीही स्वास्थ्य विकृती नसावी.दोन किंवा तीन करडांना जन्म देण्याची क्षमता असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. प्रजननासाठी निवडलेला बोकड जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.दीड ते दोन वर्षे वयाचा बोकड निवडावा.
Goat Farming Scheme
Goat Farming SchemeAgrowon

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ.अर्चना पाटील-कदम


Goat Breeding : शेळी निरोगी असावी. कोणतीही स्वास्थ्य विकृती नसावी.दोन किंवा तीन करडांना जन्म देण्याची क्षमता असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. प्रजननासाठी निवडलेला बोकड जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.दीड ते दोन वर्षे वयाचा बोकड निवडावा.

शेळी पालन व्यवसाय करताना कळपातील प्रत्येक पिढीत आनुवंशिक सुधारणा होणे अपेक्षित असते. गोठ्यामध्ये जातिवंत शेळी, बोकड असेल तरच उत्तम प्रतीची करडे आपणास मिळतात. यासाठी चांगली शेळी,बोकड निवडताना शास्त्रीय गोष्टींची तपासणी आवश्यक आहे.
१) पायाभूत कळपाच्या निवडीसाठी १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य ठरते.
२) दोन दाती शेळी विकत घ्यावी. योग्य वयोगटातील शेळी,बोकड अधिक कार्यक्षम असते.
३) अधिक उत्पादनासाठी शेळीपासून दोन वर्षांत तीन वेत मिळाले पाहिजे. सक्रिय चरण्याची सवय असणे चांगले असते.
४) मऊ आणि चमकदार त्वचेच्या शेळीची निवड करावी.

५) मादीचे शरीर लांब असावे. मागील भागही प्रशस्त असावा.
६) पोटाचा भाग रुंद असलेल्या जनावरांची चारा पचवण्याची क्षमता अधिक असते.
७) शेळी उभी राहताना पाय एकमेकांस समांतर व मजबूत असावेत. पाय सरळ असावेत, टाचेवर व खुरांच्या पुढच्या भागावर जोर देऊन उभ्या राहण्याकडे कल नसावा. 
८) शरीर समोरून मागे पसरत जाणारे असावे. तोंड लांब असावे. नाकपुड्या मोठ्या व लांब असाव्यात, डोळे मोठे, चमकदार असावेत. मान लांब पातळ व खांद्याशी व्यवस्थित जुळलेली असावी. छाती भरदार व रुंद असावी.

Goat Farming Scheme
Goat Farming : सोशल मीडियावरून करतोय शेळी, बोकडांची विक्री

९) शेळी निरोगी असावी. कोणतीही स्वास्थ्य विकृती नसावी. जातीचे गुणधर्म दर्शविणारी असावी.
१०) कासेची कोणत्याही प्रकारच्या दोषांसाठी पूर्ण तपासणी करावी.कास लवचिक असावी. मादीमध्ये चांगली मातृत्वप्रवृत्ती असावी.
११) दोन किंवा तीन करडांना जन्म देण्याची क्षमता असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी.
१२) झटपट वजन वाढणाऱ्या शेळीची निवड करावी.
१३) दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. 
१४) शेळी, बोकड प्रजननासाठी निवडताना वंशावळ जरूर पहावी.

Goat Farming Scheme
Goat Farming: परदेशी नोकरी सोडून कोकणात आफ्रिकन बोअर शेळी संगोपन

जातिवंत निरोगी नर महत्त्वाचा ...
दहा शेळ्यांची गर्भधारणा करण्यासाठी एका जातिवंत बोकडाचा वापर करावा. म्हणूनच जन्मणाऱ्या पिढीमध्ये अर्धी जनुके नराकडूनच येत असतात. त्याच प्रमाणे बोकडामध्ये आनुवंशिक सुधारणा केल्यास ती कळपात झपाट्याने होते. म्हणूनच बोकड हा जातिवंत असावा.
१) प्रजननासाठी निवडलेला बोकड जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा.
२) दीड ते दोन वर्षे वयाचा बोकड निवडावा. तो चपळ असावा.
३) मऊ आणि चमकदार त्वचेच्या बोकडांची निवड करावी
४) पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा. म्हणजे पुढील पिढ्यांत जुळी व तिळी करडे देण्याचे प्रमाण वाढते.
५) पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
६) बोकडाचे पाय एकमेकांस समांतर, मजबूत असावेत व सरळ असावेत.

७) बोकड उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा. शरीर प्रमाणबद्ध, हाडे सरळ व शरीराशी सुबद्ध असावीत. मागील पायांवर व्यवस्थित उभे राहावयास पाहिजे.
८) माजावर आलेल्या शेळीस त्वरित भरण्याची क्षमता बोकडामध्ये असावी. आहार व वातावरणाचा परिणाम हा वीर्यनिर्मिती व त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा दिसून येतो. सामान्यतः थंडीच्या दिवसांत नर
जोमदार असतो.
पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यांपासून झालेला असावा.
९) पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
------------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. प्राजक्ता जाधव,९८१९६६४७५१
(सहाय्यक प्राध्यापक,पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com