Goat Market : विट्यात बोकड, शेळ्यांच्या बाजारात आठवड्याला २२ लाखांची उलाढाल

जनावरांची खरेदी-विक्री ठप्प : वार्षिक ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न
Goat Market
Goat MarketAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Goat Market Rate : विटा, जि. सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Agricultural Produce Market Committee ) आठवड्याला बोकड, शेळ्यांच्या खरेदी-विक्रीतून २२ लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल होत आहे. मात्र गाई, म्हशींची खरेदी-विक्री ठप्प आहे.

बाजार समितीला विविध करांतून वर्षाला ३० ते ३५ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. जनावरांचा बाजार सुरू झाल्यास उत्पन्नात आणखी भर पडेल.

मध्यंतरी जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या लम्पी स्कीन आजारामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश बाजार समित्यांना दिले होते.

आता बाजार भरविण्याचे आदेश जिल्हाधिकान्यांनी दिले आहेत. मात्र खरेदी विक्रीसाठी येथे जनावरे येत नसल्याचे चित्र आहे.

Goat Market
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची उलाढाल

खानापूर व कडेगाव तालुक्याची संयुक्त विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी शेळ्या, बोकड, म्हशी, गाईंची खरेदी-विक्रीसाठी बाजार भरतो.

सध्या येथे बोकड व शेळ्यांची खरेदी-विक्री होत आहे. लम्पी स्कीन आजारामुळे जनावरांचे बाजार बंद केले होते. जनावरांचा बाजार सध्या बंदच आहे. तो सुरू करण्याची गरज आहे.

Goat Market
Goat Farming : तुम्हाला शेळ्यांच्या या जाती माहिती आहेत का?

सात तालुक्यांतून शेतकरी दाखल
आटपाडी तालुक्यानंतर विटा येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. पुर्वी शेतकरी बाजाराच्या आदल्या दिवशी विटा येथे मुक्कामाला येत. दुसऱ्या दिवशी जनावरांची खरेदी-विक्री करून जात.

आटपाडी, कडेगाव, रहिमतपूर, कऱ्हाड, मायणी, तासगाव, पलूस भागातून विटा येथे शेतकरी जनावरे खरेदी व विक्रीसाठी येत. आता जनावरांचा बाजारच बंद आहे.

त्यामुळे बोकड, शेळ्यांच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक उलाढाल होत आहे. या उत्पन्नाबरोबर बाजार समितीला गाळे भाडे, प्लॉट भाडे, भाजीपाला लिलाव गाळे, बाजार शुल्क, गेट पास, नूतनीकरण यामधून वार्षिक ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाकडे बाजार समितीची वाटचाल सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com