Animal care : लम्फी स्कीन रोगावर नव्या लसीची मात्रा

२०१९ पासून भारतात लम्फी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ओडिशा राज्यांत प्रथम हा रोग आढळून आला. दरवर्षी वाढता संसर्ग लक्षात घेऊन या आजाराच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राचे तज्ज्ञ लसनिर्मितीच्या प्रयत्नांत होते.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

नवी दिल्ली : देशभरात सध्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात लम्फी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी हिसार येथील राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राने भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या (इज्जतनगर) सहयोगाने ‘लम्फी- प्रोव्हॅकइण्ड’ ही (Lumpy Provenand) लस विकसित केली आहे. या लसीच्या वितरणास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण खात्याचे मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra singh Tomar) यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच प्रारंभ करण्यात आला.

२०१९ पासून भारतात लम्फी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ओडिशा राज्यांत प्रथम हा रोग आढळून आला. दरवर्षी वाढता संसर्ग लक्षात घेऊन या आजाराच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राचे तज्ज्ञ लसनिर्मितीच्या प्रयत्नांत होते. अखेर या शास्त्रज्ञांना लस संशोधनास यश आले आहे. केंद्र सरकार या लसीचे व्यावसायिक उत्पादन करण्याच्या तयारीत आहे.

Lumpy Skin Disease
Animal Care : काय आहेत लंपी त्वचा रोगाची लक्षणे ?

‘लम्फी- प्रोव्हॅकइण्ड’ लसीच्या संशोधनाबाबत कृषिमंत्री तोमर म्हणाले, ‘‘देशात सुमारे ३० कोटी पशुधन आहे. या पशुधनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेळेवर लसीकरण महत्त्वाचे आहे. ‘लम्फी- प्रोव्हॅकइण्ड’ लसीच्या वापराबाबत सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लम्फी स्कीन रोगाचा प्रतिबंध करण्यास मदत होईल. सर्व राज्यात तातडीने या लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाला आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

Lumpy Skin Disease
Animal Care: जनावरांमध्ये स्पायडर लिलीची विषबाधा

लस वितरणास प्रारंभ सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला, कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, सचिव जितेंद्रनाथा स्वैन, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हिमांशू पाठक, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिवेणी दत्त, भारतीय अश्‍व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. यशपाल आणि संशोधन संस्थेतील तज्ज्ञ उपस्थित होते.

सहा राज्यांत जनावरे मृत्युमुखी

देशाभरातील सहा राज्यात या रोगामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात आतापर्यंत राजस्थानमध्ये २१११, गुजरात १६७९, पंजाब ६७२, हिमाचल प्रदेश ३८, अंदमान आणि निकोबार २९, तर उत्तराखंडमध्ये २६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्र आणि भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था मिळून प्रतिमहा अडीच लाख लसनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. प्रति डोसची किंमत १ ते २ रुपये असेल. या लसीचा प्रभाव एक वर्ष असेल.
बी. एन. त्रिपाठी, उपमहासंचालक, पशुविज्ञान, आयसीएआर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com