Team Agrowon
माश्या, डास, गोचीड, इ. द्वारे हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो.
हा रोग उष्ण व दमट वातावरणात जास्त होतो.
हा विषाणूजन्य रोग असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात.
जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
जनावराला ताप येतो, डोळ्यातून व नाकातून पाणी येते. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात.
बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा रोग निरोगी जनावरात पसरतो.
पशूतज्ज्ञांच्याकडून लसीकरण करणे हाच खात्रीशीर उपाय आहे.