Lumpy Skin : लम्पी स्कीनमुळे मृत जनावरांची मिळणार भरपाई

Lumpy Skin Compensation : पशुवैद्यकीय विभागाने तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला होता. त्यातील १८० मृत जनावरांच्या पालकांना पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाई मिळाली.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon

Nipani News : गतवर्षी महाराष्ट्रात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग जास्त प्रमाणात झाला होता. त्यामुळे तब्बल वर्षभर जनावरांची खरेदी-विक्री बंद होती. तरीही त्याचा संसर्ग कालांतराने कर्नाटकात सीमाभागातही वाढत गेल्याने पशुपालक धास्तावले.

Lumpy Skin Disease
Lumpy Infection in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव, तीन तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली

निपाणी तालुक्यात गतवर्षी लम्पी स्कीनने २२५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पशुवैद्यकीय विभागाने तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला होता. त्यातील १८० मृत जनावरांच्या पालकांना पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाई मिळाली. भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित ४५ पशुपालकांनाही येत्या चार दिवसांत भरपाई मिळणार आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी'चा प्रार्दुभाव वाढला, चार जनावरांचा मृत्यू

लम्पी स्कीनमुळे तब्बल एक वर्ष विविध ठिकाणचे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पशुवैद्यकीय विभाग व प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या कालावधीत पशुपालकांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. तालुक्यातील अनेक बाजार बंद असल्याने जनावरांच्या बाजाराशी संलग्न व्यवसायही बंद होते. या व्यावसायिकांनाही इतर कामे करावी लागली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com