Lumpy Infection in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव, तीन तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली

Lumpy Skin Disease : कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत. जवळपास ३० ते ४० जनावरे आढळल्याची माहिती समोर आली आहे.
Lumpy Infection
Lumpy InfectionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Lumpy Infection : कोल्हापूर जिल्ह्यात लम्पी रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत.

जवळपास ३० ते ४० जनावरे आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत लसीकरणाची मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन माहिती अधिकारी प्रमोद बाबर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, जिल्ह्यातील काही तालुक्यात ३० ते ४० जनांवरांना लम्पीची लागण झाली आहे. यावर तातडीने उपचार म्हणून जनावरांचे लसीकरण पूर्ण करत आहोत.

आतापर्यंत १ लाख ४१ हजार डोस जिल्ह्यात पुरविण्यात आले आहेत. यादृष्टीने ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव आहे तेथून जवळपास ५ किमीपर्यंत जनावरांचे पहिल्यांदा लसीकरण केले जाणार असल्याची माहिती बाबर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, आपल्या जनावरांना कोणताही त्रास होत असल्यास जिल्ह्यातील पशुपालकांनी ताबडतोब आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. यामुळे त्या पशुपालकाच्या जनावरांना योग्य तो उपचार पोहोचण्यास मदत होणार आहे. दरम्यान लम्पीची साथ आली आहे परंतु मागच्या वेळीसारखी त्याची तीव्रता कमी आहे. यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता माहिती देण्याचे आवाहन बाबर यांनी केले.

Lumpy Infection
Lumpy Skin Vaccination : बैलगाडा शर्यतीसाठी ‘लम्पी’चे १०० टक्के लसीकरण आवश्‍यक

अशी घ्या काळजी

तसेच आपला गोठा पूर्णपणे स्वच्छ ठेवावा, ज्या जनावराला लम्पीची लागण झाली आहे त्या जनावराला विलगीकरणात ठेवावे, याचबरोबर जनावरांच्या त्वचेवरील व्रणामधून, नाकातून वाहणारा स्राव, लाळ आदीमुळे 'लम्पी'चा फैलाव होत असल्यामुळे पशुपालकांनी मच्छर, गोचीड, गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी असे जिल्हा पशुसंवर्धन माहिती अधिकारी डॉ. प्रमोद बाबर म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पहिल्यांदा ऑगस्ट २०२२ मध्ये 'लम्पिस्किन'ची लागण झाली होती. यानंतर जिल्ह्यात लम्पीने हाहाकार माजवला होता. यानंतर काही महिन्यांनी यावर नियंत्रण मिळवण्यात आले होते. परंतु पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पशुपालक भितीच्या छायेत जाण्याची शक्यता आहे.

तर पुन्हा आर्थिक मदत मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार लम्पीमुळे ज्या जनावरांचा मृत्यू झाला होता त्या पशुपालकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत होती. परंतु मागच्या ३१ मार्चपासून ही बंद करण्यात आली होती. ही योजना पुन्हा चालू ठेवण्याचा निर्णय कृषी व पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ एप्रिल २०२३ नंतर 'लम्पी'मुळे दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकास आर्थिक मदत मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com