मांस उत्पादनासाठी ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन

कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना मग तो मांस उत्पादनासाठी असो किंवा अंडी उत्पादनासाठी असो, योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे.
Broiler Management
Broiler ManagementAgrowon
Published on
Updated on

कुक्कुटपालनाचा (poultry farming) व्यवसाय करताना मग तो मांस उत्पादनासाठी असो किंवा अंडी उत्पादनासाठी असो, योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे. ब्रॉयलर (broiler) कोंबड्यांची वाढ ही अतिशय वेगाने होत असते. या कोंबड्या केवळ ५ ते ६ आठवड्यात विक्रीस तयार होतात. कमी जागेत जास्त कोंबड्या ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा विपरीत परिणाम कोंबड्याच्या वाढीवर झालेला दिसून येतो. कोंबड्यांना लागणाऱ्या जागेमध्ये वयासोबतच ऋतुमानानुसार बदल करावा लागतो.

ब्रॉयलर कोंबड्यांना त्यांच्या वयानुसार जागा पुरविली पाहिजे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी डीप लिटर (deep litter)पद्धतीमध्ये कोंबड्यांना सुरुवातीचे तीन आठवडे वयापर्यंत अर्धा चौरस फूट जागेची गरज असते. चौथ्या आठवड्यात जागेची गरज वाढून एक चौरस फूट इतकी लागते.

Broiler Management
परसात कोणत्या कोंबड्या पाळाव्यात ?

हा व्यवसाय करण्यासाठी एक दिवसीय पिल्ले हॅचरीमधून विकत आणली जातात. या एकदिवसीय पिल्लांना कृत्रिमरीत्या उब देऊन त्यांचे व्यवस्थापन केले जाते, याच प्रक्रियेला ब्रूडिंग म्हणतात. पिल्लांच्या शरीराचे तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना सुरुवातीचे काही दिवस कृत्रिम ऊब देणे गरजेचे असते. सभोवतालच्या तापमानानुसार ऊब देण्याचा कालावधी आणि तीव्रता कमी-जास्त करावी लागते.

Broiler Management
कोंबड्या का पाळाव्यात?

ब्रॉयलर कोंबड्या सहा ते आठ आठवड्यामध्ये दीड ते दोन किलोपर्यंत वाढतात. साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते. ब्रॉयलर कोंबड्या या मांस उत्पादनासाठी पाळल्या जात असल्याने, जितकं जास्त वजन मिळेल, तितके फायद्याचे ठरते. पहिला पूर्ण आठवडा भरडलेला मका देत असताना, तिसऱ्या दिवसापासून स्टार्टर खाद्य देण्यास सुरुवात करावी. वयानुसार कोंबड्याना स्टार्टर आणि फिनिशर फीड दिले जाते. सुरुवातीचे एक ते चार आठवडे पक्ष्यांना स्टार्टर फीड दिले जाते. चार आठवड्याच्या पुढे त्यांना फिनिशर फीड दिले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com