Cattle Conservation : गीर गोवंशाचे संवर्धन करणारी बन्सी गोशाळा

Cattle Farming : अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी गोशाळा आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व शिक्षणाचे केंद्र झाले आहे. येथील गोपालभाई सुतारिया यांनी स्थापन केलेल्या गोशाळेत जातिवंत सातशे गीर गायींचे पालन होत आहे.
Cattle Conservation
Cattle ConservationAgrowon
Published on
Updated on

Bansi Goshala Ahmedabad : अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी गीर गोशाळा आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व आकर्षणाचे केंद्र झाले आहे. भारतीय देशी गाय संस्कृती संवर्धन हे ध्येय ठेऊन अहमदाबाद येथील गोपालभाई सुतारिया व कुटुंबीयांनी गोशाळा आणि गोतीर्थ विद्यापीठाची स्थापना केली आहे. गोपालभाई पूर्वी मुंबई येथे व्यावसायिक होते.

अहमदाबाद येथेही त्यांचा व्यवसाय आहे. भारत सरकारच्या पशुपालन व डेअरी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य त्याचबरोबर विविध संस्थांशीही ते जोडले गेले आहेत. आठ गायींपासून सुरवात झालेल्या या गोशाळेत आज लहान-मोठ्या धरून सातशेहून अधिक गायी आहेत. गीर गायींमध्येही सुवर्ण कपिला, श्‍वेत कपिला वा अन्य विविधता आढळते.

अशा सर्वांचे संवर्धन करून देशी गोवंश टिकवून ठेवण्याचे कार्य येथे सुरू आहे. गोशाळेतील अनेक गायींनी १० तर काहींनी १५ व्या वेताचा टप्पा पार केला आहे. आजही त्या काटक आहेत. प्रत्येक गायीचा संगणकीकृत इतिहास (हिस्टरी) वा नोंदी ठेवल्या आहेत. प्रत्येक गायीचे नामकरण केले असून हाक देताच त्या जवळ येऊन प्रेमाने बिलगतात.

Cattle Conservation
Cattle Conservation : सेवाभावी वृत्तीने नृसिंहवाडीत गोसंवर्धन

चारा खाद्यव्यवस्था

गायींची संख्या मोठी असल्याने दररोज किमान १० ते १२ टन चारा लागतो. त्यासाठी सुमारे १२ एकरांवर चारा उत्पादन घेतले जाते.काही चारा उत्पादक शेतकऱ्यांसोबत करार करून चाऱ्याची गरज पूर्ण केली जाते. पौष्टिक घटकांचे प्रमाण, चव, खाण्यासाठी दिली जाणारी पसंती आदींचा अभ्यास करून चारापिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे.

हवेशीर वातावरण

गायींचे मुक्त वातावरणात संगोपन होते. यामुळे फिरणे व व्यायाम होऊन गायी निरोगी राहतात.मुबलक सूर्यप्रकाशासाठी पूर्व-पश्‍चिम दिशेने गोठा निर्मिती केली आहे. दुभत्या, गाभण गायी, नवजात वासरे असे ‘कंपार्टमेंटस’ आहेत. त्यानुसार गव्हाण, पाण्याचे हौद आहेत. जागोजागी कॅल्शियमचे चाटण दगडही ठेवले आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये नंदी (बैल) सुद्धा असतो. नैसर्गिक पद्धतीने प्रजनन केले जाते.

दूध, तूप निर्मिती

गोशाळेतील सरासरी गाय दिवसाला १० ते कमाल १२ लिटरपर्यंत दूध देते. विशेष म्हणजे दोन सडांतीलच दूध काढले जाते. वासराचाही त्या दुधावर हक्क असल्याने उर्वरित सडांतील दूध त्याला पाजण्यात येते. गोशाळेत प्रति दिन ८०० ते १००० लिटर दूधसंकलन होते. अर्थात हा आकडा कायम सारखा राहात नाही. अहमदाबाद शहरातील ग्राहकांना दररोज १५० ते २०० लिटर दुधाची २०० रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. बहुतांश दुधावर प्रक्रिया करून तूप व अन्य पदार्थ बनवले जातात.

आयुर्वेदिक शास्त्रात असलेले महत्त्व लक्षात घेऊन गोशाळेत साठहून अधिक पंचगव्य आधारित उत्पादने, पूरक आहारजन्य घटकांची निर्मिती करण्यात आली आहे. सतरा वितरण केंद्रांद्वारे तसेच ‘ऑनलाइन’ पद्धतीने देशभरात उत्पादने उपलब्ध केली आहेत. शेतीसाठी उपयोगी जीवाणूंवर आधारित द्रवरूप कल्चरही तयार केले आहे. वापराच्या प्रशिक्षणाबरोबर शेतकऱ्यांना ते मोफतही पुरविले जाते. विविध राज्यांतील असंख्य शेतकरी या रसायनमुक्त शेतीशी जोडले गेले आहेत.

Cattle Conservation
Indigenous Cattle : देशी गोवंश संवर्धनासाठी ॲप, आधार कार्ड निर्मिती

गोशाळा, गोतीर्थ विद्यापीठ परिसरातील उपक्रम

कोणत्याही शासकीय अनुदान वा दानाशिवाय उत्पादने, कंपोस्ट विक्रीतून गोशाळेचा कारभार चालतो. -देश-परदेशातील अभ्यासक, गोभक्त, शेतकरी, शास्त्रज्ञ, आयुर्वेदाचार्य, शेतीतील संघटना या गोशाळेशी जोडले आहेत.

गोशाळेत दररोज होते होमहवन, सायंकाळी गायींची आरती

निवासी शिक्षणाची सुविधा.

सध्या विद्यापीठात ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

प्रक्षेत्रावर रासायनिक अंशमुक्त अन्नधान्याची निर्मिती

शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुविधा

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ- www.bansigir.in

नंदी गीर संवर्धन योजना

यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. अशावेळी गोपालभाई व कुटुंबीयांनी नंदी गीर संवर्धन योजना सुरू केली आहे. यात इच्छुकांना निश्‍चित कालावधीसाठी नंदी विनाशुल्क देण्यात येतो.

अर्थात त्यापूर्वी ज्यांच्याकडे जो सोपवायचा त्यांची पूर्ण खातरजमा केली जाते. आत्तापर्यंत विविध ठिकाणी विशेषतः आदिवासी भागात अडीचशेहून अधिक नंदी देण्यात आले आहेत. त्यातून गोवंश वाढीला मोठा फायदा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com