Silk Farming
Silk FarmingAgrowon

Silk Farming : उझीमाशी नियंत्रण, नवीन तुती लागवडीवर मार्गदर्शन

Silk Worms Pest : वाकी ः जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे व सिल्कबेरी फेड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता.४) महारेशीम अभियानांतर्गत उझिमाशी नियंत्रण व नवीन तुती लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Published on

Pune News : वाकी ः जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे व सिल्कबेरी फेड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता.४) महारेशीम अभियानांतर्गत उझिमाशी नियंत्रण व नवीन तुती लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, शिरूर, तसेच बाहेरील जिल्ह्यातील असंख्य रेशीम शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रीय रेशीम प्रकल्प, क्यूबा सरकारचे राष्ट्रीय सल्लागार डॉ. ए. डी. जाधव यांनी बोलताना उझी माशीपासून कीटकांचा बचाव करण्याच्या अनेक सोप्या उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले, की एका समूहातील सर्व रेशीम शेतकऱ्यांनी एकाच वेळी बॅच घेऊन एकत्रितपणे उपाययोजना राबवल्या तर उझी माशीपासून रेशीम किटकांचा बचाव करणे शक्य आहे.

Silk Farming
Silk Farming : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

विस्तार अनुसंधान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ हुमायून शरीफ यांनी तुतीबाग जोपासना तसेच प्रौढ कीटक व्यवस्थापन यासंदर्भात माहिती दिली. रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी रेशीम अभियानांतर्गत लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना शासनाच्या रेशीम विषयी मनरेगा आदी योजनांविषयी मार्गदर्शन केले. तसेच जयप्रकाश कुलकर्णी यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याविषयी माहिती दिली.

साहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, धवल क्रांती फाउंडेशनचे डॉ. किशोर उढान, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, सरपंच सोनल विनोद टोपे, उपसरपंच प्रिया टोपे, चेअरमन सोमनाथ टोपे, धनंजय कड,

तालुका कृषी अधिकारी एम. बी. वाणी, सिद्धार्थ कोहिनकर, डॉ लहू खैरे, पीएसआय विजय टोपे, संदीप आगवणे, प्रमोद शिरसाट, सुशांत तापकीर, रेशीम उद्योजक विठ्ठल सुकाळे इ. मान्यवर उपस्थित होते. संपत टेमगिरे यांनी सूत्रसंचालन केले. सिल्क बेरी परिवाराचे विजय गारगोटे यांनी आभार मानले..

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com