Lumpy Skin : लसीकरण, वाहतूक प्रमाणपत्राशिवाय गोवंश पशुधनास जिल्ह्यात बंदी

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
Published on
Updated on

सांगली ः जिल्ह्यातील साखर (Sugar) कारखान्यांच्या (Sugar factory) गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील जिल्ह्यांतून ऊसतोड मजुरांबरोबर वाहतुकीसाठी आवश्यक बैल व अन्य पशुधनांची वाहतूक सुरू आहे. लसीकरण (Lumpy Skin Vaccination) न झालेल्या अथवा बाधित जनावरांची जिल्ह्यात वाहतूक केल्यामुळे लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Lumpy Skin
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

गोवंशीय पशुधनास लसीकरण व वाहतूक प्रमाणपत्राशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलिस व पशुसंवर्धन विभागाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर तात्पुरते तपासणी नाके उभारावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

डॉ. दयानिधी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, तात्पुरत्या स्वरूपात उभारणी केलेल्या तपासणी नाक्यांवर २४ तास कडक पाहणी करून विनालसीकरण प्रमाणपत्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊस तोड मजुरांच्या पशुधनास प्रवेशबंदी करावी. तात्पुरत्या तपासणी नाक्यांवर लसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.

Lumpy Skin
Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

ऊसतोड मजुरांची गुरे साखर कारखान्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कारखाना प्रशासकाकडून नेमलेल्या पशुवैद्यांमार्फत अशा गुरांची तपासणी करून ती ऊस वाहतुकीसाठी योग्य असल्याबाबत खातरजमा करून घ्यावी. गुरांची दैनंदिन तपासणी करून लम्पी स्कीन आजाराची लक्षणे दिसून आल्यास, अशा गुरांचे तत्काळ विलगीकरण करून, तसे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्तांना कळविणे बंधनकारक आहे.

या आजाराची लक्षणे पशूंमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक आजारास प्रतिबंध नियंत्रण अधिनियमानुसार लेखी स्वरूपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक आजारास प्रतिबंध नियंत्रण अधिनियमानुसार संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com