Animal Feed : दुभत्या जनावरांसाठी अंजनचा पाला खाद्य

Animal Care : चोपडा तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या पहिल्या तीन रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात अंजनची लागवड असून, असंख्य जुनी झाडी आजही टिकून आहेत.
Animal Fodder
Animal FodderAgrowon
Published on
Updated on

Chopda News : चोपडा तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या सातपुड्याच्या पहिल्या तीन रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात अंजनची लागवड असून, असंख्य जुनी झाडी आजही टिकून आहेत. या झाडांना मोठ्या प्रमाणावर पाला येऊ लागला आहे.

हा पाला पौष्टिक असल्याने दुभत्या जनावरांसाठी फायदेशीर व पोषक ठरतो. त्यामुळे तो तोडून अनेक मजूर सपाटीवर आणून विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे.पूर्वी हा पाला साखरेच्या पोत्याच्या दराने विकला जात असे. मात्र, आता काही ठिकाणी तो किलोप्रमाणे विक्री होत आहे.

Animal Fodder
Animal Feed : संक्रमण काळात हवा संतुलित पशुआहार

सायकलीवर त्याची ने-आणही केली जाते. एका सायकलीवर दोन पोते भरून आणल्यास एक क्विंटलपर्यंत अंजनचा पाला एक मजूर तोडून वाहून आणू शकतो. अशाप्रकारे हा पाला सपाटीवरच्या गावांमध्ये येत आहे. तो दुभत्या गाई, म्हशींसाठी वापरात येऊ लागला आहे. अंजनला येणाऱ्या शेंगा या पोष्टिक असतात.

Animal Fodder
Animal Feed : पशुखाद्य बॅगवर घटक नोंदवा

त्या खाऊ घातल्यास दुभत्या जनावरांच्या दुधाचा फॅटही वाढल्याचे निष्कर्ष या अगोदरच सिद्ध झाले आहेत. या शेंगा ढेपेच्या तोडीच्या समजल्या जातात. त्यामुळे शेतकरी व गोठे, तबेलेमालक अंजनच्या पाल्याची खरेदी करतात. ठरल्याप्रमाणे काही मजूर हा पाला तोडून आणतात व ठरलेल्या ठिकाणी किलोनुसार किंवा पोत्याप्रमाणे त्याची दररोज विक्री केली जाते.

अशाप्रकारे लासूर भागातून व मामलदे, नागलवाडी, बोरअजंटी या भागातून हा पाला सपाटीवरच्या गावांमध्ये गोठे मालक व दुभत्या जनावरांच्या पालकांकडे विक्री केला जातो. गेले अनेक वर्ष सुरू असलेले काम पाला वाढल्याने आजही सुरू आहे. ठराविक मजूर त्या कामात गुंतले असल्याचे चित्र दिसून आले आहे.

अशाप्रकारे लासूर भागातून व मामलदे, नागलवाडी, बोरअजंटी या भागातून हा पाला सपाटीवरच्या गावांमध्ये गोठे मालक व दुभत्या जनावरांच्या पालकांकडे विक्री केला जातो. गेले अनेक वर्ष सुरू असलेले काम पाला वाढल्याने आजही सुरू आहे. ठराविक मजूर त्या कामात गुंतले असल्याचे चित्र दिसून आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com