Animal Feed : पशुखाद्य बॅगवर घटक नोंदवा

Poultry Feed : करारावरील व्यवसायाबाबत केंद्र शासनाने नियमावली तसेच करारपत्राचा नमुनाही निश्‍चित केला आहे. परंतु कंपन्या मनमानी पद्धतीने करार करून घेत शेतकऱ्यांची पिळवणूक करतात.
Poultry Feed Bag
Poultry Feed Bag Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : करारावरील व्यवसायाबाबत केंद्र शासनाने नियमावली तसेच करारपत्राचा नमुनाही निश्‍चित केला आहे. परंतु कंपन्या मनमानी पद्धतीने करार करून घेत शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. त्यासोबतच पोल्ट्री खाद्याच्या बॅगवर त्यातील घटक नमूद करावे, असेही शासन आदेश आहेत. या दोन्ही निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री योद्धा फेडरेशनकडून करण्यात आली आहे.

पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी, उपाध्यक्ष दीपक पाटील, मनोज दासगावकर, पेण तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, अलिबाग तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील, निखील ढोकळे, चंद्रहास बांदल, राजेश पाटील, शंकर तांबोळी, प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्‍त कार्यालयात बैठक झाली.

Poultry Feed Bag
Animal Feed : पशुपक्षी खाद्याच्या बॅगवर होणार अन्नघटकांची नोंद

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांच्यासह पोल्ट्री करारदार कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच खाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठकीत पशुसंवर्धन मंत्री यांनी पोल्ट्री फिडच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविली जाईल, असे आदेश दिले होते.

Poultry Feed Bag
Animal Feed : संक्रमण काळात हवा संतुलित पशुआहार

त्यानुसार शासन आदेशही काढण्यात आला. परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही या निर्णयाची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. शेतकरी व कंपन्यांमध्ये करारावर कुक्‍कुटपालन करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या गाइडलाइन आहेत.

त्यानुसार करारपत्राचा नमुनाही निश्‍चित आहे, असे फेडरेशनकडून स्पष्ट केले. या प्रसंगी पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. सचिन देशपांडे यांनी आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता लवकरच केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार करार आणि पशुखाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. त्यानुसार शासन आदेशही काढण्यात आला. परंतु अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलन करण्यात आले. आता १५ ऑक्टोबरनंतर पशुखाद्याच्या बॅगवर घटक नोंदविले जातील, असे आश्‍वासन पशुसंवर्धन उपायुक्‍तांच्या बैठकीत देण्यात आले. त्याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.
- अनिल खामकर, अध्यक्ष, पोल्ट्री योद्धा फेडरेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com