Animal Census
Animal CensusAgrowon

Animal Census : पशू गणनेसाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज

Animal Husbandry Department : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पशू गणनेसाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी दिली.
Published on

Kolhapur News : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पशू गणनेसाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी दिली. ते म्हणाले, की २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ होणार आहे.

चार महिने म्हणजे ३१ डिसेंबर या पर्यंत ही मोहीम राबविण्यात येईल. ग्रामीण भागासाठी दर तीन हजार कुटुंबामागे एक प्रगणक तर शहरी भागासाठी चार हजार कुटुंबामागे एक प्रगणक नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हयात एकूण २८१ प्रगणक व ८२ पर्यवेक्षकांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

Animal Census
Wildlife Census : अकोले तालुक्यात वन्यजीवांची गणना

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. यंदाची पशुगणना १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून तयारी केली जात आहे. पशुगणनेसाठी प्रगणकाची नेमणूक केली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये डॉ. शेजाळ व डॉ बाबर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ शशांक कुलकर्णी यांनी केले आहे.

तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात १२५५ गावांसाठी २०५ प्रगणक व ६१ पर्यवेक्षक असून, शहरी भागासाठी ७६ प्रगणक व २१ पर्यवेक्षक असे एकूण २८१ प्रगणक व ८२ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे.

Animal Census
Animal Census : यंदाच्या गणनेत आढळले तीन हजार ३३२ प्राणी

पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी, पशुपालनात वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या आधारावर शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. २० वी पशुगणना २०१९ मध्ये पार पडली होती.

‘पशुपालकांनी खरी माहिती द्यावी’

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरण, औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील जनावरांची खरी माहिती पशुपालकांनी प्रगणक यांना द्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शेजाळ यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com