Animal Census : यंदाच्या गणनेत आढळले तीन हजार ३३२ प्राणी

Animal Update : मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात बुद्धपौर्णिमेला गुरूवारी (ता. २३ ) रोजी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणथळावरील प्रगणनेत सर्व प्रकारचे ३ हजार ३३२ प्राणी आढळले.
Animal Census
Animal CensusAgrowon

Nanded News : मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात बुद्धपौर्णिमेला गुरूवारी (ता. २३ ) रोजी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणथळावरील प्रगणनेत सर्व प्रकारचे ३ हजार ३३२ प्राणी आढळले.

मागील वर्षी ३०२७ प्राण्यांची नोंद झाली होती. यंदा ३०५ ने प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अस्वल, नीलगाय, चितळ, भेकड, रानमांजर, कोल्हा, लांडगा, ससा यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे.

Animal Census
Ujani Bird Census : उजनीत ३ मार्चला पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राणीगणना करण्यात आली. जिल्ह्यात माहूर, मांडवी, किनवट, बोधडी, अप्पारावपेठ, इस्लापूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, नांदेड, देगलूर, मुखेड अशी एकूण १२ वनपरिक्षेत्रे आहेत. वनरक्षक, वनपाल, क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांचा यात सहभाग होता.

वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणस्थळावर ट्रॅपकॅमेरे, ठशांच्या अभ्यासावरून व निरीक्षणयातून ही गणना करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात सर्व प्रकारचे ३ हजार ३३२ प्राणी आढळले. विशेष म्हणजे अन्नसाखळीतील सर्व प्राणी येथे आहेत. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत बिबट एकने, रानडूकर १०५ तर, काळवीटांची संख्या ९४ ने घटली आहे.

Animal Census
Animal Census : भीमाशंकर अभयारण्यात ‘वन्यजीव’तर्फे प्राणीगणना

१२ वन क्षेत्रात आढळलेले विविध प्राणी(कंसातील संख्या मागील वर्षाची )

अस्वल १८ (१२), बिबट ४(०५), रानडूक्कर ७१० (८१५), निलगाय ७९६ (७०४), चितळ ६ (०२), भेकड १९ (१६), वानर ९१८ (९०६), रानमांजर ३१ (१८), सायाळ १९ (१८), ससा ९५ (५२), कोल्हा ८७ (४०), मुंगूस ६० (३२), लांडगा १७ (०१), काळवीट २५५ (३४९), मोर २३४ (५७) असे यावर्षीचे ३ हजार ३३२ प्राणी आढळले आहेत.

नांदेड जिल्हयात सर्व प्रकारचे प्राणी आहेत. एक दिवसातील ही गणना आहे. त्यामुळे प्राण्यांची संख्या अधिकही असू शकते.
केशव वाबळे, (उपवनसंरक्षक, नांदेड वन विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com