
Satara News : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव व आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांचे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सात दिवसीय सुधारित जातीच्या जनावरांचे संगोपन या विषयावर प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षणामध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील पशुविज्ञान व दुग्धशास्त्र प्राध्यापक डॉ. शैलेश कांबळे यांनी दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन व डॉ. महेंद्र यादव यांनी जनावरांचे आजार व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जिल्हा कोल्हापूर येथील विषय विशेषज्ञ पशुविज्ञान सुधीर सूर्यगंध यांनी सुधारित गोठा व्यवस्थापन व मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे, मोहळ कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक यांनी डॉ. तानाजी वळकुंडे लहान, मोठ्या व भाकड जनावरांचे आहार व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. तेजस शेंडे यांनी दूध उत्पादन क्षमता वाढ होण्यासाठी जनावरांचे पैदास व्यवस्थापण या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र बँकेचे श्री. साबळे यांनी बँकेच्या पशुपालकांसाठी उपयुक्त वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांनी कर्ज प्रकरण मंजूर होण्याची, वसुलीची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती दिली. प्रगतिशील पशुपालक हिरालाल सस्ते यांनी पशुपालनातील अर्थशास्त्र व डॉ. सोनकांबळे यांनी प्रजनन संस्थेतील बिघाड यांची माहिती दिली.
पशुधनापासून मिळणाऱ्या शेणखताचे योग्य व्यवस्थापन व मूल्यवर्धनासाठी जीवामृत बनविणे याविषयी विषय विशेषज्ञ भूषण यादगिरवार यांनी माहिती दिली. एकदल व द्विदल चारा पीक लागवड आणि चारा प्रक्रियाअंतर्गत उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादनामध्ये होणारी घट टळावी व पौष्टिक चारा मिळण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने मुरघास बनवण्याची कृती याविषयी विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प संचालक, आत्मा अजय शेंडे यांनी पशुपालकांसाठीच्या शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगून शेतकऱ्यांना या उपक्रमांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.