Animal Husbandry: पशुपालनासाठी दीर्घकालीन धोरणांची गरज

Livestock Management: पशुपालनासाठी सुधारित व्यवस्थापन, प्रगत खाद्य तंत्रज्ञान आणि वर्धित उत्पादन कार्यक्षमता यांचा समावेश असलेला बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी रास्त परतावा मिळाला पाहिजे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

डॉ. दिनेश भोसले

Farming Strategic Development: पशुपालनासाठी सुधारित व्यवस्थापन, प्रगत खाद्य तंत्रज्ञान आणि वर्धित उत्पादन कार्यक्षमता यांचा समावेश असलेला बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी रास्त परतावा मिळाला पाहिजे. पशुपालन व दुग्ध व्यवसायाचा हरितगृह उत्सर्जनातील वाटा कमी करण्यासाठी, या क्षेत्राचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन दीर्घकालिन धोरण आखण्याची गरज आहे.

जगभरातील अंदाजे १५० दशलक्ष कुटुंबे दूध उत्पादनात गुंतलेली आहेत. बहुतेक विकसनशील देशांमध्ये, दूध उत्पादन लहान शेतकऱ्यांद्वारे घेतले जाते. दुधाचे उत्पादन घरगुती उपजीविका, अन्न सुरक्षा आणि पोषण यासाठी महत्त्वाचे ठरते. दूध हे लहान-उत्पादकांना तुलनेने जलद परतावा देते आणि रोख उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. अलीकडे विकसनशील देशांनी जागतिक दुग्ध उत्पादनात त्यांचा वाटा वाढवला आहे. परंतु ही वाढ प्रति जनावर उत्पादन म्हणजे उत्पादकता वाढवून मिळालेली नाही तर जनावरांची संख्या वाढल्याचा तो परिणाम आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry: पशुसंवर्धन म्हणजे काय रे भाऊ?

विकसनशील देशांमध्ये दूध उत्पादकता खूप कमी आहे. खराब गुणवत्तेची खाद्य संसाधने, रोगांचा प्रादुर्भाव, बाजारपेठेतील मर्यादित प्रवेश, तुटपुंज्या सेवा (उदा. आरोग्य, पत, प्रशिक्षण) आणि दुधाळ जनावरांची कमी आनुवंशिक क्षमता ही त्याची प्रमुख कारणे होत. तसेच अनेक विकसनशील देशांमध्ये उष्ण आणि/किंवा दमट हवामान आहे; जे दुग्ध व्यवसायासाठी प्रतिकूल असते. काही विकसनशील देशांमध्ये दूध उत्पादनाची प्रदीर्घ परंपरा आहे आणि तेथील आहारात दूध किंवा त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना महत्त्वाचे स्थान आहे. इतर देशांनी अलीकडच्या काळात दूध उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे.

तुम्हाला माहीत आहे का?

गेल्या तीन दशकांत जागतिक दुग्ध उत्पादनात ७७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या (एफएओ) आकडेवारीनुसार १९९२ मध्ये ५२४ दशलक्ष टन दूध उत्पादन होते; ते २०२२ मध्ये ९३० दशलक्ष टनावर पोहोचले.

भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. जागतिक दूध उत्पादनात २२ टक्के वाटा भारताचा आहे. भारतानंतर अमेरिका, पाकिस्तान, चीन, ब्राझील यांचा क्रमांक लागतो. जगातील प्रमुख १० गाय दूध उत्पादक देश पुढीलप्रमाणे- भारत, अमेरिका, चीन, ब्राझील, जर्मनी, रशिया, फ्रान्स, पाकिस्तान, न्यूझीलंड, टर्की. १९७० पासून, दूध उत्पादनाचा सर्वाधिक विस्तार दक्षिण आशियामध्ये झाला आहे.

गायींची उत्पादकता

प्रजनन, खाद्य आणि उत्पादन प्रणालीमधील फरकांमुळे गायींच्या दूध उत्पादकतेमध्ये देशनिहाय तफावत दिसते. एफएओच्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये दुधाळ गायींची जागतिक सरासरी उत्पादकता सुमारे २५०० लिटर/गाय/वर्ष होती. विकसित देशांमध्ये विकसनशील देशांच्या तुलनेत गायीची दूध उत्पादकता खूप जास्त आहे. सांख्यिकीदृष्ट्या जगातील सगळ्या देशांची गाय दूध उत्पादकता जर इंग्लंडएवढी झाली, तर सध्याचे दूध उत्पादन मिळविण्यासाठी सध्याच्या गायींच्या संख्येच्या जवळपास एक तृतीयांश गायी पुरेशा आहेत.

म्हणजे सध्या जगात २६५ दशलक्ष गायींपासून जितके दूध मिळते त्यासाठी केवळ ८३ दशलक्ष गायी पुरेशा होतील. जगाची वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता दूध उत्पादकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry : भारतातील विविध समुदायांच्या पारंपारिक पशुपालन संस्कृतीचे भव्य चित्र

भारतातील दूध उत्पादन

देशात २०२२-२३ मध्ये एकूण दूध उत्पादन २३०.५८ दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे. आधीच्या ५ वर्षांच्या तुलनेने दूध उत्पादनात २२.८१ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. २०१८-१९ मध्ये वार्षिक विकास दर ६.४७ टक्के होता; २०१९-२० मध्ये ५.६९ टक्के; २०२०-२१ मध्ये ५.८१ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ५.७७ टक्के राहिला.

२०२२-२३ मध्ये सर्वाधिक दूध उत्पादक राज्य उत्तर प्रदेश होते. त्याचा एकूण दूध उत्पादनात १५.७२ टक्के वाटा होता, त्यानंतर राजस्थान (१४.४४ टक्के), मध्य प्रदेश (८.७३ टक्के), गुजरात (७.४९ टक्के) आणि आंध्र प्रदेश (६.७० टक्के) यांचा क्रमांक लागतो. वार्षिक विकास दराच्या (एजीआर) बाबतीत, कर्नाटक (८.७६ टक्के), त्यानंतर पश्‍चिम बंगाल (८.६५ टक्के) आणि उत्तर प्रदेश (६.९९ टक्के) असा क्रम लागतो.

आघाडीची दहा दूध उत्पादक राज्ये (२०२४ ची आकडेवारी)

उत्तर प्रदेश

राजस्थान

मध्य प्रदेश

गुजरात

आंध्र प्रदेश

पंजाब

महाराष्ट्र

हरियाना

बिहार

कर्नाटक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com