Animal Acidosis : जनावरांना शिळे अन्न खाऊ घातल्याने होऊ शकतो जनावरांचा मृत्यू

Animal Health : रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये चयापचय हा आजार होतो. अत्यंत घातक, कोणतीही पूर्व सूचना न देता, खरी माहिती जर उपलब्ध झाली नाही तर रोगनिदानासाठी अवघड, त्यातच उपचारास विलंब झाला तर जनावरांचा मृत्यू होतो.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Animal Care : अनेक वेळा घरगुती कार्यक्रम समारंभानंतर उरलेले अन्न, जादा झालेले अन्न, शिळे अन्न हे घरच्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांच्या आहारात वापरले जाते. काही वेळा भटकी जनावरे ते खातात किंवा खाऊ घातले जाते.

या शिळ्या अन्नाच्या अति सेवनामुळे जनावरांच्यामध्ये चयापचयाचा आजार होतो. अति गंभीर परिस्थितीमध्ये जनावरांचा मृत्यू होतो. म्हणून जनावरांना शिळे अन्न देऊ नये.

चयापचय आजाराची कारणे

१) रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये चयापचय हा आजार होतो. अत्यंत घातक, कोणतीही पूर्व सूचना न देता, खरी माहिती जर उपलब्ध झाली नाही तर रोगनिदानासाठी अवघड, त्यातच उपचारास विलंब झाला तर जनावरांचा मृत्यू होतो.

२) आजारात जनावराच्या मुख्य पोटाचा (रूमेन) सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असतो, तो ५.५ पेक्षा खाली येतो. त्यामुळे पोटाची हालचाल थांबते, भूक, दूध उत्पादन घटते. बदललेल्या आम्लधर्मीय वातावरणात पोटातील जिवाणू जादा आम्ल तयार करतात. त्यानंतर आम्ल शरीरात शोषले जाऊन जनावरांचा मृत्यू होतो.

Animal Husbandry
Milch Animal Diet : दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ जनावरांना द्या योग्य आहार

३) आजारामुळे जनावरांचे दूध उत्पादन घटते, फॅट कमी लागते, जनावर चारा पाणी कमी घेते. मागील पायामध्ये लंगडते, पातळ शेण टाकते, त्यामध्ये बुडबुडे, फेस काही वेळा पोट, आतड्यातील खरवडलेली त्वचा, धान्याचे कण दिसू शकतात. रवंथ कमी होते. अनेक वेळा हा आजार तीव्र स्वरूपाचा किंवा कमी तीव्र स्वरूपात आढळतो.

४) आजारात मुख्यत्वे करून कार्बोदकाचे (कार्बोहाइड्रेट) जास्त प्रमाणात सेवन हे मुख्य कारण आहे. आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असणे, ते पिठाच्या स्वरूपात असणे, उदा. शिळी भाकरी, गव्हाची खीर (लापशी), पोळ्या वगैरे. मानवी सेवनासाठीच्या अन्नामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात.

हे पदार्थ शिळे झाले की, त्यामध्ये बुरशीची वाढ होते. असे शिळे अन्न फार मोठ्या प्रमाणात खाऊ घातले तर निश्चितपणे जनावरांच्या पोटातील सामू बिघडून ॲसिडोसिसचा प्रादुर्भाव वाढतो.

जनावर वेळेत व तत्काळ उपचार न मिळाल्यास मृत्युमुखी पडते. चयापचय आजाराचे गांभीर्य लक्षात घेता जनावरे फार वेळ उपाशी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.शिल्लक अन्न कोणत्याही परिस्थितीत जनावरांना खाऊ घालू नये.

Animal Husbandry
Animal Science Diploma : आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर

जनावरांवर उपचार

१) तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गरजेनुसार इंजेक्शन, सलाईन लावावे.

२) प्रकृती गंभीर असेल तर पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील सर्व खाल्लेले खाद्यान्न बाहेर काढून जनावराचे प्राण वाचवावे लागतात.

(लेखक सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com