Animal Science Diploma : आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर

राज्यात बारावीनंतर तीन वर्षे कालावधीचा ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News राज्यात बारावीनंतर तीन वर्षे कालावधीचा ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स (Diploma In Veterinary Science) हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच सत्र अधिक एक प्रशिक्षण सत्र असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप राहील. पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी ६० विद्यार्थी प्रतिवर्ष एवढी प्रवेश क्षमता निश्‍चित करण्यात आली आहे.

पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत मुंबईत याबाबत नुकतीच बैठक झाली. प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टे, उपसचिव मकरंद कुळकर्णी, अतिरिक्त आयुक्त शीतल मुकणे, शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. अजय गावंडे, डॉ. अजय खानविलकर, राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे डॉ. रामदास गाडे, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे मारुती कानोले, डॉ. सुनील सहातपूरे, अनिल मेहेर उपस्थित होते.

Animal Husbandry Department
Animal Care : पशुधनाची आधी तपासणी मगच खरेदी

बैठकीत ठरल्यानुसार, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे सध्या पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर राबविला जात आहे. त्याची प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात येईल.

या अभ्यासक्रमास यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ विनियमामध्ये विहित (प्रवेश घेतल्यापासून कमाल चार वर्षे) कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम बंद करताना आता पदविकेसाठी बारावीची अर्हता निश्‍चित केली आहे.

Animal Husbandry Department
Animal Care : गाई, म्हशींच्या संक्रमण काळातील आहार व्यवस्थापन

- बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषयात उत्तीर्ण आवश्‍यक

- तीन वर्षांचा पदविका अभ्यासक इंग्रजी माध्यमातून राहणार

- पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, प्रयोगशाळांबाबतचे धोरण ‘माफसू’ दोन महिन्यांत ठरविणार

- विद्यापीठस्तरावर सहआयुक्त (पशुसंवर्धन) दर्जाच्या अधिकारी समाविष्ट सदस्याची समिती गठित करण्याचे प्रस्तावित

- संस्थाचालकांना चार महिन्यांत पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे बंधनकारक. तसे न केल्यास २०२४-२५ या वर्षांपासून अभ्यासक्रमास प्रवेश बंद केलेजाणार

- निकषांच्या पूर्ततेबाबत पडताळणीसाठी विद्यापीठस्तरीय समिती राहणार. तिच्या अहवालानंतरच विद्यालयास प्रवेश मान्यतेबाबतचा निर्णय

- नवीन अभासक्रमाची परीक्षा घेणे, निकाल व गुणपत्रिकेची कार्यवाही सध्याच्या परीक्षा विभागामार्फतच होईल.

- स्वतंत्र परीक्षा कक्ष स्थापन करण्याबाबत विद्यापीठस्तरावर ठरविण्यात येईल.

Animal Husbandry Department
Animal Care : व्याल्यानंतर गाई - म्हशींना कसा आहार द्यावा?

प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी ‘माफसू’ला मुभा

पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्धतंत्रज्ञान विषयाचे कौशल्य विकसित करण्यासाठी व त्याद्वारे स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत ‘माफसू’ला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

विना अनुदानितसाठी कायद्यात बदल

‘माफसू’अंतर्गंत पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन या विद्या शाखेतील कायमस्वरूपी विना अनुदानित खासगी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. तो विधी व न्याय विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून दहावीवर आधारित पदविका अभ्यासक्रम बंद केला जाईल. त्याऐवजी बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थांसाठी पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाईल. त्या अनुषंगाने सुविधा असलेल्या संस्थाचालकांना त्याकरिता परवानगी दिली जाईल. त्यासाठीचा अभ्यासक्रम लवकरच तयार केला जाईल. याच वर्षी अंमलबजावणी होईल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com