Team Agrowon
दूध उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापनासह जनावरांना समतोल आहारही देणे आवश्यक
गाई, म्हशींच्या पचनसंस्थेवर गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादन अवलंबून असते.
जनावरांच्या कासेतील ग्रंथीच्या योग्य वाढीसाठी तसेच व्याल्यानंतर दूध निर्मितीसाठी प्रथिने, ऊर्जा, खनिजे, जीवनसत्त्वे या सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाणात गरज असते.
दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो.
जनावरांच्या आहारात मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गहू, तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून खुराक तयार करतात.
दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात.
दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या आहारात खुराकाचा वापर हळूहळू वाढवावा. अचानक जास्त प्रमाणात खुराक देऊ नये. जनावर विण्याच्या अगोदरपासून खुराकाचा वापर सुरू करावा.