Pune News: पिंगोरीत साकारतोय सामूहिक गोठा

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाघेश्‍वरी महिला दूध उत्पादक बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक गोपालनाच्या पथदर्शी प्रकल्पासाठी ॲटोस कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून सुमारे ४२ लाख रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

पुणे ः ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) पिंगोरी (ता.पुरंदर) येथे महिला बचत गटाच्या (Women Self Help Group) माध्यमातून सामूहिक गोपालन (Collective Cow Rearing) आणि दुग्ध प्रक्रिया साकारत आहे.

यासाठी ॲटोस उद्योग समूह आणि रोटरी क्लबच्या सामाजिक दायित्वातून सहकार्य होत आहे. यासाठी कंपनीने ४२ लाखांचा निधी दिला असून, २५ गायींच्या गोठ्यासाठी २४ गुंठ्यावर बंदिस्त आणि मुक्तगोठा साकारात आहे.

Animal Care
Animal Care : तंत्रज्ञान, व्यवस्थापनातूनच गोशाळा होतील सक्षम

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाघेश्‍वरी महिला दूध उत्पादक बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक गोपालनाच्या पथदर्शी प्रकल्पासाठी ॲटोस कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून सुमारे ४२ लाख रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे.

या निधीतून बचत गटातील महिलांना प्रत्येकी एक गाय देण्यात आली असून या सर्व गाईंच एकाच ठिकाणी पालन केले जाणार आहे. यासाठी २४ गुठे जागेवर बंदिस्त आणि मुक्त गोठा उभारण्यात आला आहे. हा गोठा सौरऊर्जेवर असून, गोठ्यात मिल्क पार्लर करण्यात आले आहे.

Animal Care
Animal Care : जनावरांतील गोचीडांचे नियंत्रण कसे कराल?

सोमवारी (ता. ९) पिंगोरी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना ॲटोस उद्योगाच्या सामाजिक दायित्व निधी प्रकल्पाचे प्रमुख मुरली मेमन म्हणाले,‘‘ पारंपारिक दुग्ध व्यवसाय बदलतो आहे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज शेतकरी आपल्या दुग्ध व्यवसायात भरभराट आणतो आहे.

Animal Care
Animal Care : सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात ‘गजेंद्र’ ठरतोय आकर्षण

दुग्ध व्यवसायात एक नवीन आदर्श पद्धतीचा अवलंब होताना दिसतो आहे. सामुहिक गोठा प्रकल्पामुळे महिलांच्या अर्थचक्रास गती मिळणार आहे.

तर महिला बचत गटाचा सामुहिक दूध प्रकल्प हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असावा. या प्रकल्पासाठी आम्ही भविष्यात देखील सहकार्य करू असे आश्‍वासन दिले.‘‘

यावेळी ॲटोसचे सीएसआर समितीचे सदस्य नीलेश धोपटकर, आदेश सरबुकन, रोटरी स्पोर्टस सिटी क्लबचे अध्यक्ष सॅम्युएल केनेडी, औंध क्लबचे अध्यक्ष सुखानंद जोशी, ब्रीज सेठी भावना उलंगवार संदेश सावंत यांच्यासह वाघेश्‍वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना शिंदे, पिंगोरीचे सरपंच संदीप यादव, उपसरपंच प्रकाश शिंदे, जीवन शिंदे, ज्योती शिंदे, सुषमा भोसले, अमोल शिंदे, माजी पोलिस पाटील राहुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा शिंदे यांनी केले, रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर रवींद्र उलंगवार यांनी आभार मानले.

२५ गायींच्या माध्यमातून हा सामूहिक गोठा साकारत आहे. सध्या १८ गायी प्राप्त झाल्या असून, २५ गायी दाखल झाल्यावर दररोज २५० ते ३०० लिटर दूध संकलन आणि भविष्यात प्रक्रिया उद्योग साकारण्याचे उद्दिष्ट आहे.

- बाबा शिंदे, प्रकल्प समन्वयक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com