Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

Lumpy Skin : सांगलीत पशुधन पर्यवेक्षकांची २९ पदे कंत्राटी पद्धतीने भरली

लम्पी स्कीन संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी डॉक्टर नेमण्याची परवानगी मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे.
Published on

सांगली ः जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात कंत्राटी पद्धतीने २९ पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor) डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांत हे डॉक्टर कामावर हजर होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. तसेच लम्पी स्कीन बाधित (Lumpy Skin Infected Animal) जनावरांसाठी एक कोटी रुपयांची औषध खरेदी केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : अमरावती जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण

डॉ. पराग म्हणाले, की लम्पी स्कीन संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी डॉक्टर नेमण्याची परवानगी मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद येथील सिनर्जीज सोल्युशन्स कंपनीकडून २९ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. दोन दिवसांत ते हजर होतील.

तसेच लम्पी स्कीन बाधित जनावरांना औषधोपचार कमी पडू नयेत, म्हणून जिल्हा परिषदेने ५० लाख रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. २० लाख रुपये इंधन, मानधन देण्यासाठी खर्च करणार आहे. ३० लाख रुपयांची औषधे खरेदीसाठी जिल्हा पशुधन उपायुक्त कार्यालयासाठी निधी दिला आहे.

Lumpy Skin
Lumpy skin : ‘लम्पी’च्या लढाईत बैलांकडे दुर्लक्ष नको

सेवादात्यांची मानधनावर नियुक्ती

जिल्ह्यातील पशुधनाच्या लसीकरणासाठी ३११ सेवादात्यांची नियुक्ती केली असून त्यांना प्रतिपशुधन तीन रुपयांप्रमाणे मानधन देणार असल्याचे डॉ. पराग यांनी सांगितले.

नवीन ३० जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा संसर्ग

लम्पी स्कीन त्वचा रोगाची नवीन ३० जनावरांना बाधा झाली आहे. यामुळे बाधित जनावरांचा आकडा तीनशेपार झाला आहे. सद्यःस्थितीत २३७ जनावरांवर उपचार सुरू आहेत. ७७ बाधित जनावरे लम्पी स्कीनमुक्त झाली आहेत, तर १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ४७८ जनावरांचे लसीकरण झाले आहे. २ लाख ४३ हजार १०० लसींचा साठा आजवर प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या लम्पी स्कीनला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण गतीने केले जात आहे. आजअखेर गाय आणि बैलांचे ८१ टक्के लसीकरण झाले आहे.
डॉ. सदाशिव बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com