Lumpy Vaccination : अमरावती जिल्ह्यात ९० टक्के लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत भड यांनी दिली.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन (Animal Husbandry) उपायुक्त प्रशांत भड यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत लम्पी स्कीनच्या (Lumpy Skin)नियंत्रणासाठी प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे.

Lumpy Skin
Lumpy skin : ‘लम्पी’च्या लढाईत बैलांकडे दुर्लक्ष नको

पशुसंवर्धन विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने लसीकरणात खासगी पशुवैद्यकांची देखील मदत घेण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ६४ हजार गायवर्गीय पशुसंवर्धन पशुधनांपैकी सुमारे तीन लाख ४० हजार ३३ एवढ्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’च्‍या अटकावासाठी ग्रामस्‍तरीय समिती होणार स्थापन

दुर्गम मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. याशिवाय १४ तालुक्यातील १८० गावांमध्ये या आजाराची लागण झाली आहे. २७ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार ४,६५९ पशुधन या रोगामुळे बाधित आहे.

Lumpy Skin
Crop Loan : सीबिलमधून शेतीकर्जे वगळा ‘रयत क्रांती’ची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

लम्पी स्किनमुळे १०० पेक्षा अधिक जनावरे दगावली असून जनावरे दगावण्याचे सर्वाधिक प्रमाण हे मेळघाटात आहे. तालुकानिहाय लसीकरणअचलपूर ३०,८७७, अमरावती २५,४८६, अंजनगाव सुर्जी २५,०९६, चांदूरबाजार २४,२५९, चांदुर रेल्वे २३,०२०,

चिखलदरा ३४,०९७, दर्यापूर २८,५९१, धारणी ३१,५०५, मोर्शी २४,३१५, नांदगाव खंडेश्वर २०,६२८, तिवसा १८,५५१, वरुड २३,२४३, धामणगाव रेल्वे १४,६३२, भातकुली १५,७३३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com