Success Story of a Resilient Village Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : व्यावसायिक पीक पद्धतीद्वारे शाश्‍वतीची दिशा

Rural Development : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकेकाळी दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर शेततळी, पाणी व्यवस्थापन, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व अन्य फळबागांकडे शेतकरी वळले.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Jal SanVardhan- Water Conservation : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लहुकी नदीच्या तीरावर गाढे जळगाव वसले आहे. लोकसंख्या सुमारे सहा हजारांपर्यंत असून, गावच्या एकूण ९५४ हेक्टर क्षेत्रापैकी खरिपाचे ६९३ हेक्टर तर रब्बीचे १९० हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. साधारण २०१२ पूर्वी गाढे जळगाव शिवारात शेतकरी पारंपरिक बाजरी, मका, कपाशी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घेऊन कुटुंबाचा चरितार्थ भागवायचे.

सन २०१२ मध्ये दुष्काळाने गावच्या शेतीची दयनीय अवस्था केली. आधीच पाणी कमी त्यात हा दुष्काळ. मात्र हीच संधी समजून एकेक करीत शेतकऱ्यांनी विहीर, बोअरवेलला शासकीय योजनेअंतर्गत शेततळ्यांची जोड दिली. नदी, नाल्यांवर बांध झाले. त्यातून पाण्याबरोबर पिकांची शाश्‍वती आली.

डाळिंबाचं लोण

सन २०१२-१३ मध्येच गोलटगावातून डाळिंबाचे लोण गावच्या शिवारात आलं. पुढे याच पिकानं इथल्या शेतकऱ्यांना आठ- दहा वर्षे केवळ तारलंच नाही तर भक्कम साथही दिली. त्यानंतर तेलकट डागरोगाची समस्या तीव्र होऊन क्षेत्र घटलं. पुन्हा बऱ्यापैकी मोसंबी, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, पेरू आदींकडे शेतकरी वळले. आजही वळताहेत.

काहींनी डाळिंबाला द्राक्षाची जोड दिली. परंतु आताच्या घडीला एकच शेतकरी या पिकात टिकून आहे. एक शेतकरी फुलशेतीत सक्रिय आहे. गावात कपाशी, मका, बाजरी आदी हंगामी पिकांबरोबर टोमॅटो, कांदा, कोबी, वांगी आदी भाजीपाला होतो. फळपिकांमध्ये डाळिंब २६ हेक्टर, मोसंबी २३ हेक्टर, सीताफळ १२ हेक्टर, ड्रॅगन फ्रूट सात हेक्टर अशी पिके आहेत.

पूरक व प्रक्रिया व्यवसायात संधी

गावशिवारातील बहुसंख्य शेतकरी कमी- अधिक प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात. गावात पाचशेच्या आसपास संकरित गाई, म्हशी असतील. एक हजार ते पंधराशे लिटरपर्यंत प्रति दिन एकूण दूध संकलन होते. कृष्णा कोरडे प्रक्रियेकडे वळले असून पनीर निर्मिती करू लागले आहेत. एक- दोन संख्येपासून २५ ते ३० संख्येपर्यंत शेळीपालन होते.

सुमारे अडीचशेपर्यंत शेळ्या तर दोनशे ते ३०० पर्यंत मेंढ्या गावात आहेत. थोड्या प्रमाणात कुक्कुटपालनही होतं. अण्णासाहेब व अर्जुन या कोरडे भावंडांनी धान्य क्लीनिंग ग्रेडिंग युनिट सुरू केले आहे. गावाची लोकसंख्या बऱ्यापैकी असल्याने छोटे हॉटेल, कृषी सेवा केंद्र व असे प्रक्रिया उद्योग रोजगाराच्या संधी निर्माण करतात.

शेतकऱ्यांचे अनुभव

गावातील हरिभाऊ ठोंबरे यांना २०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी तसेच २०१९ मध्ये ‘ॲग्रोवन युवा शेतकरी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गावातील शेतीतील बदल सांगताना ते म्हणाले, की २०१२ मधील दुष्काळ ही संधी समजून काहींनी एकत्र येऊन डाळिंबाचा श्रीगणेशा केला. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन, शेततळी या माध्यमातून डाळिंब पीक जगवून भरपूर उत्पन्नही घेतलं. माझ्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा मीही अन्य शेतकऱ्यांना करून दिला. आजही कोणतेही शुल्क न घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना माझ्या अनुभवाचा फायदा करून देतो आहे.

गणेश विष्णू ठोंबरे म्हणाले, की कष्ट करेल त्याची शेती आहे पंधरा वर्षांपासून मी भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी यांसह कपाशीतही मेथी, कोथिंबीर असे प्रयोग करतो. नव्याने डाळिंब लागवड केली आहे. टोमॅटोसाठी पॉली मल्चिंग तंत्रज्ञान वापरतो. दीड एकरांत पपई बागही आहे. गावातील फुलबेग मिर्झा यांचं कुटुंब कायम शेतीत रमणारं आहे. त्यांचे चिरंजीव जावेदबेग म्हणाले, की एक एकरवर आम्ही कायम भाजीपाला कायम करतो.

पाण्याची गरज ओळखून २०१२ मध्ये पहिले व पुढे दुसरे शेततळे घेतले. डाळिंब व पपईची बाग आहे. सहायक कृषी अधिकारी कृष्णा गटुवार म्हणाले, की शासकीय योजना शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. आता पोकरा २ मध्ये या गावाचा समावेश झाला आहे. प्रयोगशील तसेच विज्ञान- तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभागाचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य राहिले आहे.

ड्रॅगन फ्रूटची लागवड

अण्णासाहेब दिगंबर ठोंबरे यांनी गावात सर्वप्रथम २०२१ मध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड केली. त्याआधी सोशल मीडियासह सोलापूर, पंढरपूर आदी ठिकाणी जाऊन बागांची पाहणी केली. एकरी आठ टनांपासून ते १२ टनांपर्यंत उत्पादन साध्य केलं. ७५ ते १३५ रुपये प्रति किलोपर्यंत पुणे मुंबईच्या बाजारात दर मिळवला. डाळिंबाच्या तुलनेत या पिकात उत्पादन खर्च कमी आहे. मजुरांचा प्रश्‍न बऱ्यापैकी निकाली निघाला आहे. मागील दोन वर्षांत शिवारात २५ ते ३० एकरांत शेतकऱ्यांनी नव्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे.

मजूरटंचाई ओळखून व्यवस्थापन

साहेबराव पाटील- अंतराळे यांचा शेतीत चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते म्हणाले की आता उत्पादन खर्च वाढला आहे. बहुतांश उत्पन्न खर्चातच जातं. मजुरांचा प्रश्न गंभीर आहे. तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या साह्याने शेती करताना मजुरांची गरज कमी लागते. परंतु जी गरज लागते तीसुद्धा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. कमीत कमी मजुरांच्या आधाराने मोसंबी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आदी पिकांकडे वळलो आहे.

फुलशेतीचा आधार

आकाश गाडेकर व कुटुंबीयांना फुलशेतीचा मोठा आधार आहे. एक एकर सात गुंठ्यांच्या आसपास या फुलशेतीत विविध फुले ते घेतात. हार व कलाकुसर करून ग्राहकांच्या गरजेनुसार त्याचा पुरवठा करतात. त्यातून कुटुंबाचं अर्थकारण त्यांनी सक्षम केलं आहे.

जल व अन्य व्यवस्थापन

गाव शिवारात सुमारे २८० विहिरी.

अनेकांकडे बोअरवेल.

फेब्रुवारी- मार्चनंतर शेततळ्यांचाच फळपिकांना आधार.

गाव शिवारात सुमारे ४० शेततळी.

सुमारे ३८५ हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली.

शेतीला यांत्रिकीकरणाचेही बळ दिले आहे.

विजेचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी ३३ सौरपंपांचा आधार शेतकऱ्यांनी घेतला आहे.

हरिभाऊ ठोंबरे ९७६५११८४४२

अण्णासाहेब ठोंबरे ८८८८५२५७५७

साहेबराव पाटील अंतराळे ९४२३३९७७४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT