Success Story Agrowon
यशोगाथा

Wakeshwar Farmers Producers Company : शेती, पूरक, प्रक्रियेवर भर देणारी वाकदची ‘वाकेश्‍वर’

Santosh Munde

Success Story : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकद येथील (ता. कन्नड) दहा शेतकऱ्यांनी २००६ मध्ये एकत्र येत बचत गट स्थापन केला. १०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत बचत सुरू झाली. त्यातून २०१० मध्ये ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गट व नोव्हेंबर २०१४ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत वाकेश्‍वर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली.

मुख्य संचालकांकडून एक लाख व सभासदांकडून एक हजार रुपये याप्रमाणे भाग भांडवलाची उभारणी केली. तीन आर्थिक संस्थांनी कर्ज देऊन हातभार लावला. वाकद परिसर तसेच कन्नड व सिल्लोड तालुक्‍यातील २५ गावांतील ६०० शेतकरी कंपनीशी सभासद म्हणून जोडले गेले आहेत.

अध्यक्षपदी कारभारी रामदास मनगटे, सचिवपदी जनार्दन जानोबा भडगे तर संचालक म्हणून उत्तम यशवंत धनिधर, कैलास हिम्मतराव डव्हारे व ताराबाई साहेबराव किर्तक जबाबदारी पाहतात. ‘प्रमोटर’ म्हणून भीकन डव्हारे, दीपक दाशरथे, दिलीप मनगटे, धनाजी थोरात, कैलास किर्तक यांच्याकडे कार्यभार आहे.

कंपनीचे उपक्रम

‘वाकेश्‍वर’ने शिवारातील पीक पद्धती लक्षात घेऊन २०१५ मध्ये मिनीडाळ मिल व ‘क्लीनिंग- ग्रेडिंग’ युनिटची उभारणी केली. डाळी, गहू आटा, हळद- मिरची पावडर, पशुखाद्य निर्मिती सुरू केली.

सभासदांना क्विंटलला ८० रुपये, तर बिगर सभासदांना १०० रुपये दराने प्रतवारी करून देण्यास सुरुवात केली. परिसरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने कंपनीने ‘बॉयलर’ ही घेतला. सध्या वापर कमी असला तरी त्यातून व्यावसायिक हातभार लागला आहे.

पोल्ट्री व्यवसाय

गट शेती सबलीकरण योजनेतून ‘वाकेश्‍वर’ने पोल्ट्री व्यवसायाला उत्तेजन दिले. सुरुवातीला २५ शेतकऱ्यांना एक हजार पक्षी संगोपनासाठी शेड उभारणीला मदत केली. २० टक्‍के शेतकरी वाटा, २० टक्‍के बँक कर्ज व ६० टक्‍के शासनाच्या मदतीतून हे काम झाले.

सध्या ३५ शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी कंपनीने उभे केले आहे. सुमारे ४५ दिवसांत अडीच किलो वजनाचे पक्षी हे शेतकरी तयार करतात. वाकेश्‍वर कंपनी त्यांच्याकडून ते घेऊन पाच व्यापाऱ्यांना पुरवते. वर्षाला सहा ते आठ बॅचेस शेतकरी घेतात.

प्रति हजार पक्ष्यांच्या बॅचमागे शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. सुमारे ४० दिवसांना १४० टन मक्याची गरज सभासदांना असते. कंपनी तो शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यापासून खाद्य तयार करते. पोल्ट्री व्यावसायिकांना देते.

कंपनीचे काही उपक्रम अवजारे बँक

-कृषी विभागाच्या गटशेती सबलीकरण योजनेतून २०१७-१८ मध्ये अवजारे बँक.

-तीन ट्रॅक्‍टर्स, दोन पेरणी यंत्रे, एक रोटाव्हेटर, एक मोगडा, दोन व तीन फाळांचे दोन नांगर, गादीवाफा निर्मिती यंत्र, ट्रॉली.

-सभासदांना प्रचलित दरापेक्षा २०० रुपये कमी दराने यंत्रांद्वारे काम करून दिले जाते.

‘केव्हीके’चे मार्गदर्शन

-वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान

केंद्राकडून सभासदासांठी मिरची, मका, आले पीक तसेच कंपनीच्या वाटचालीची दिशा याबाबत चर्चासत्रे, प्रशिक्षणे. केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन.

कलिंगडाची गटशेती

-व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात माल उपलब्ध व्हावा यासाठी २०२० मध्ये कंपनीकडून

१३० एकरांत (प्रत्येकी एक एकर क्षेत्रधारक शेतकरी) कलिंगड लागवडीचा प्रयोग.

-बाजारपेठ किंवा विक्री व्यवस्थेची कंपनीकडून मदत.

-लागवडीचे वेगवेगळे टप्पे. जेणे करून ठरावीक अंतराने माल जास्त काळ उपलब्ध होत राहिला.

-दिल्ली, बंगळूर आदी व्यापाऱ्यांशी संपर्क. सुरुवातीच्या टप्प्यात लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाच अधिक फायदा होऊन ८ ते १२ रुपये प्रति किलो दर मिळाला.

गोदाम उभारणी

-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ८० बाय ४० फूट, गट शेती सबलीकरणमधून १२० बाय ५० फूट तर महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून ४२ बाय २० फूट अशा तीन गोदामांची उभारणी. पशुखाद्यासाठीचा मका व कापसाची साठवणूक शक्‍य होणार.

शीतगृह

अलीकडेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेतून शीतगृहाची (कोल्ड स्टोअरेज) उभारणी.

- या यंत्रणेत ‘रायपनिंग’चीही सुविधा. मे २०२३ मध्ये केळी पिकवून विक्री.

-मिरची, केळी व अन्य फळांना या यंत्रणेचा लाभ होणार.

-सध्या वाहतुकीसाठी कंपनीकडे पीकअप व्हॅन. ६० टन क्षमतेचा वजनकाटा.

कंपनीची वार्षिक उलाढाल (रुपये)

२०२०-२१ ... ९८ लाख

२०२१-२२... १ कोटी ८० लाख

२०२२-२३.... ३ कोटी ४२ लाख

येत्या काळातील बाबी

-'स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मका क्लीनिंग- ग्रेडिंगची सुविधा. त्यामध्ये ड्रायर व ‘हायजेनिकली’

पशुखाद्य निर्मिती यंत्रसामग्री मंजूर. तीन कोटी ३३ लाख रुपये भांडवल.

-मॅग्नेट अंतर्गत हिरवी मिरची प्रक्रिया युनिट मंजूर

-‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट’अंतर्गत दोनशे गायी व ‘एनएलएम’मधून ५०० शेळ्या व २५ बोकड यांचा प्रकल्प प्रस्तावित.

संपर्क - कारभारी मनगटे (कंपनी अध्यक्ष) ९३०९१३६४६८, जनार्दन भडगे (सचिव) ९४२१६८२०८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT