Agriculture Barren Land Agrowon
यशोगाथा

Story of Barren Land : डोंगर उतारावरील पडीक जमीन केली सुपीक

Agrowon Diwali Ank : भविष्यातील गरज ओळखून आम्ही १९८२ मध्ये डोंगर उतारावरील पडीक जमीन खरेदी केली. वडिलोपार्जित जमीन कष्ट आणि नियोजनाच्या जोरावर टप्प्याटप्प्याने विविध पिकांची लागवड करत वहिवाटीखाली आणत सुपीक बनविली.

Team Agrowon

अतुल गायकवाड

भविष्यातील गरज ओळखून आम्ही १९८२ मध्ये डोंगर उतारावरील पडीक जमीन खरेदी केली. वडिलोपार्जित जमीन कष्ट आणि नियोजनाच्या जोरावर टप्प्याटप्प्याने विविध पिकांची लागवड करत वहिवाटीखाली आणत सुपीक बनविली. सर्व पिकांतील दैनंदिन कामाच्या नोंदी मी ठेवतो.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा हा तसा दुष्काळी तालुका. पुण्यातील अनेक कंपन्या तालुक्यात आल्याने जमीन कसण्याचा शेतकऱ्यांचा कल कमी होत गेला. अनेक शेतकऱ्यांनी जमीन विकून टाकल्या. धोम-बलकवडी धरणाचा कालवा तालुक्यातील लोहम गावातून गेला आहे. यामुळे या गावात बागायती शेती करण्याकडे हळूहळू शेतकऱ्यांचा कल वाढत गेला.

लोहम (ता. खंडाळा, जि. सातारा) हे आमचे गाव. माझ्या वडिलांसह चार भावांचे कुटुंबाचे गावातच वास्तव्य आहे. माझे मोठे चुलते शंकर सेवानिवृत्त प्राचार्य, वडील मुकुंद शेती करतात तर तिसरे चुलते दत्तात्रय गुजरातला जनरल मॅनेजर आणि सर्वात लहान चुलते यशवंत हे डाॅक्टर आहेत. सर्व कुटुंब सुशिक्षित व उच्च पदस्थ आहे.

सुरुवातीच्या काळात आमच्या कुटुंबाकडे फक्त दहा एकर जिरायती शेती होती. त्या वेळी जमिनीचे मोल फारसे नसल्याने कमी दरात जमिनी मिळत होत्या. मोठे चुलते ध्येयवादी असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहान-मोठे डोंगरावरील माळरान २२ एकर जमीन १९८२ मध्ये खरेदी केली होती. अशी त्या वेळी एकूण ३२ एकर शेती होती.

पुढे २००० मध्ये शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरची आणि आवश्यक अवजारांची खरेदी केली. दरम्यानच्या काळात माझे शिक्षण सुरू होते. माध्यमिक शिक्षण झाल्यावर पुणे येथे शिक्षणासाठी गेलो. लहानपणापासून घरातच शेतीचे धडे मिळाल्याने आपसुकच शेतीची आवड लागली होती. २००९ मध्ये मी बीएस्सी ॲग्री पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र शेतीची ओढ गप्प बसू देत नव्हती. एका वर्षातच नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले चुलते शंकर यांनी शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मला आपण शेतीच विकसित करूया असे सुचविले. मलाही ते पटले. त्यात चुलत्यांचा पाठिंबा मिळाल्याने माझा उत्साह आणखी वाढला.

तीस प्रारंभ

मी चुलत्यांसोबत शेतीत लक्ष घातले त्या वेळी केळी, पपईची शेती सुरू होती. त्या वेळी एकूण क्षेत्रापैकी फक्त पाच एकर शेती वहिवाटीखाली होती. उर्वरित क्षेत्र माळरान, डोंगराळ पडीक पडले होते. मला सुरुवातीपासूनच वाचनाची आवड असल्याने नियमित वर्तमानपत्रांसोबतच ‘ॲग्रोवन’चे वाचनही सुरू होते. दैनंदिन अंकात येणाऱ्या यशकथा, विविध पीक पद्धती, तज्ज्ञांचे लेख यांचे नियमित वाचन करत होतो. सोबतच प्रगतिशील शेतकरी आणि तज्ज्ञांसोबत सातत्याने संपर्कात होतो. त्यांचे मार्गदर्शन मला शेती विकसित करण्यासाठी कायम प्रेरणा देत गेले.

पिकांचे नियोजन

कृषी पदवीधर असल्याने शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करून पीकपद्धतीचे नियोजन केले. २०१३ मध्ये अडीच एकरांत उसाच्या फुले २६५ या जातीची लागवड केली. तत्पूर्वी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीत गाडली. ऊस रोपांची ४ बाय २ फुटांवर लागवड केली. सिंचनासाठी संपूर्ण क्षेत्रात ठिबकचा वापर केला. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार खतांच्या मात्रा व अन्य व्यवस्थापन केले.

सुरुवातीस लागवडीच्या उसाचे ८८ टन, तर खोडव्याचे ६५ टन एकरी उत्पादन मिळाले. त्यातून उत्साह वाढला. त्यानंतर पुढे को ८६०३२ व १०००१ या जातींची लागवड करण्यावर भर दिला. शेतीमधून मिळणारे उत्पन्न शेती कामांसाठीच वापरण्यावर कायम भर दिला आहे. त्याचा फायदा होत गेला. त्या माध्यमातूनच शेतामध्येच मोठे शेडदेखील उभारले आहे. त्याचा वापर शेती अवजारे, बियाणे, खते, तसेच शेतीमाल पॅकिंगसाठी केला जातो.

दहा एकर ऊस लागवडीचे स्वप्न

मी शेती करण्यास सुरुवात केल्यापासून एकदा तरी आपण १० एकरांत उसाची लागण करायची हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी जमीन आणि सिंचनाची उपलब्धता यांचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने ऊस लागवड क्षेत्रात वाढ करत गेलो. तब्बल दहा वर्षांनी म्हणजेच २०२१ मध्ये माझे हे स्वप्न पूर्णत्वास आले.

एकाच वेळी दहा एकर क्षेत्रावर उसाची लागण झाली होती. हा प्रयोग काटेकोर नियोजनातून आणि कुटुंबाच्या मदतीच्या जोरावर यशस्वी झाला होता. हा स्वप्नपूर्तीचा आनंद उत्सव म्हणून आम्ही साजरा केला. त्या वेळी जेसीबीच्या खोऱ्यात बसून आम्ही सर्व भावंडांनी एकत्रित फोटो काढला होता. तो आजही माझ्या फेसबुक खात्यावर आहे.

आज सरासरी दहा एकर क्षेत्रावर ऊस लागण, दरवर्षी पाच एकरांवर खोडवा लागवड आहे. पूर्वहंगामीचे एकरी ७५ ते ८० टन, तर खोडव्याचे ५५ ते ६० टन उत्पादन मिळते आहे. साखर कारखान्यांकडून रोपे आणून पाच बाय दोन फुटांवर लागण केली जाते. आडसाली लागण न करता प्रत्येकवेळी पूर्वहंगामात लागवड केली जाते.

एकरी आठ ट्रॉली शेणखत आणि विद्राव्य खतांच्या प्रमाणशीर वापरावर भर दिला जातो. पाॅवर टिलरच्या साह्याने भरणी केली जाते. खोडव्यात पाचट न जाळता तसेच ठेवून कुजविले जाते. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला सुधारला असून, उत्पादनही वाढले आहे. दोन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून त्यानुसार खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे दिल्या जातात.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT