Green Chili
Green Chili  Agrowon
यशोगाथा

Green Chili : दर्जेदार मिरची उत्पादनात मिळवला हातखंडा

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

नंदूरबार जिल्हा मिरचीसाठी (Green Chili) प्रसिद्ध आहे. नंदूरबारपासून सुमारे ३५ किलोमीटरवर लोंढरे गावही (ता. शहादा) मिरची उत्पादनात (Chili Production) आघाडीवर आहे. गावातील दिलीप नाझरे यांनी मिरची व केळी, पपई (Papaya) पिकांत स्वतःची ओळख तयार केली आहे. पाणीटंचाईग्रस्त (Water Shortage) अशी पूर्वी गावची ओळख होती. दुष्काळाचा दिलीप यांना मोठा फटका बसला. अनेक कूपनलिका करूनही यश आले नाही. मोठा खर्च वाया गेला. नापिकीची समस्या आली. गावात पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) मदतीने जलसंधारणाची (Water Conservation) कामे झाली. त्यात दिलीप यांचाही सहभाग राहिला. पुढे पाऊसमान बरे झाल्यानंतर कूपनलिका केली. त्यात यश आले. २००५ नंतर मात्र दिलीप यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी व सुधारित तंत्र व्यवस्थापनातून शेती प्रगतिशील करण्यात यश मिळवले.

सुधारित शेतीचे व्यवस्थापन

-दिलीप थोरले बंधू असून वसंत व भीमराव या बंधूंसह ते पूर्णवेळ शेती करतात.

-१३ एकर शेती असून एकाच ठिकाणी व १०० टक्के ओलिताखाली.

-सुमारे ३२ एकर क्षेत्र ‘लीज’ वर.

-मिरची हे मुख्य पीक. त्याचे ८ ते १० एकर क्षेत्र. पाच एकरांत उतिसंवर्धित केळी व १० एकरांत पपई.

-दोन मिनी ट्रॅक्टर्स, एक मोठा ट्रॅक्टर व दोन सालगडी.

-मिरचीची जून- जुलैत लागवड. एप्रिलपर्यंत प्लॉट सुरू राहतो.

-पाच बाय सव्वा फूट अंतरात गादीवाफा व पॉली मल्चिंग तंत्राचा वापर.

-लागवडीसाठी हलक्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड. कारण काळ्या कसदार जमिनीत अति पावसात मर व बुरशीजन्य रोगांच्या समस्या येतात.

-रोपांची नाशिक येथून खरेदी.

-८ ते १० एकरांत काढणीसाठी मजूर संख्याही मोठी लागते. दर १२ दिवसांसाठी ६० मजुरांची चोख व्यवस्था.

-वसंत हे मशागत, लागवड, काढणी, भीमराव खते, फवारणीचे तर दिलीप बाजारपेठ, विपणनाचे कामकाज सांभाळतात. कोणत्या मालाला काय बाजार राहिला याचा अभ्यास व बाजारातील विश्लेषकांशी चर्चा करून संबंधित पिकाचे क्षेत्र कमी अधिक केले जाते. त्यातून शेतीतील जोखीम कमी केली जाते.

बाजारातील मागणीनुसार वाण बदल

पूर्वी पाच इंच लांब व जाडसर वाणाची लागवड करायचे. यात हिरव्या मिरचीपेक्षा ओल्या लाल मिरचीचे उत्पादन अधिक घेणे शक्य होते. आकार मोठा, रंगही पोपटी होता. ती तिखट व अधिक बियांची होती. निर्यातीसाठीही कमी पसंती होती. आता बाजारपेठेतील मागणीनुसार टिकवणक्षमता चांगली असलेली, रोग-किडींना कमी बळी पडणारी, पावसाळ्यात अधिक चांगला प्रभाव देणारी, तीन इंच लांब, हिरवीगार व चमकदार, निर्यातक्षम अशा वाणाला पसंती दिली जाते.

गुजरातमधून खरेदी

एकरी ३० टन वा त्यापुढे उत्पादन घेण्यात दिलीप यांनी हातखंडा तयार केला आहे. मिरचीच्या निर्यातीसाठी नंदुरबार नजिक गुजरातमधील तापी जिल्ह्यातील व्यापारी सक्रिय असतात. दिलीप

यांनी पिंपळोद (ता. निझर, जि. तापी, गुजरात) येथील मिरची उत्पादक व मोठे खरेदीदार योगेश पटेल यांच्याकडून निर्यातक्षम मिरची वाण व अन्य बाबी अभ्यासल्या. पाच वर्षांपासून हिरव्या मिरचीची विक्री वाका (ता. निझर, जि. तापी) येथील व्यापाऱ्यांना थेट जागेवर होते. ही मंडळी मिरचीची निर्यात आखाती देशांना करतात. त्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपये अधिक दर मिळतो.

हिरव्या मिरचीचे दर पडल्यास पक्व व लाल स्थितीत नंदुरबारच्या बाजारात विक्री होते. एकदा हिरव्या मिरचीला किलोला सात रुपयांपर्यंत खाली दर आले तेव्हा लाल मिरची तयार केली. त्यास २५ ते ३० रुपये दर मिळाला.

केळी, पपईची शेती

-दोन्ही फळांची थेट जागेवर विक्री. त्यासाठी शहादा येथील खरेदीदारांशी संपर्क वाढविला आहे.

-केळीचे एकरी २५ ते ३० टन उत्पादन. तीन वर्षांत ५, ९ ते २०२१ मध्ये १४ रुपये प्रति किलो दर.

-पपईचे एकरी ३० टन उत्पादन. तीन वर्षांत किलोला ५ ते ७ रुपये दर.

-पपईखालील क्षेत्र बेवडसाठी चांगले. या क्षेत्रात मिरचीची लागवडही होते.

-जमीन सुपीकतेवर अधिक भर. पीक अवशेष जमिनीत गाडण्यात येतात.

-केळी, मिरची शेतात एकरी तीन ट्रॉली शेणखताचा वापर.

अभ्यासातून ज्ञानी होण्याचा प्रयत्न

मिरचीतील नावीन्य, धोके, बाजारपेठा यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक, नंदुरबार, गुजरातमधील तापी जिल्हा, छत्तीसगडमधील रायपूर येथील कृषी विज्ञान केंद्र, मिरची उत्पादकांकडे भेट दिली. प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत संपर्क वाढविला. कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले.

नंदुरबारचे मार्केट प्रसिद्ध

मिरचीसाठी नंदुरबार बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथे ऑगस्ट ते एप्रिल दरम्यान मोठी उलाढाल होते. फेब्रुवारीत ओली लाल मिरची बाजारात येते. ती वाळवून परदेशात विक्री होते. सुमारे दहा प्रसिद्ध खरेदीदार आहेत. येथील मिरची गुजरात, मध्य प्रदेशातही पाठविण्यात येते. मागील तीन वर्षे दिलीप यांना व एकूणच बाजारात हिरव्या मिरचीला किमान ३० व कमाल ७५ रुपये प्रति किलो व सरासरी ४० रुपये दर मिळाला. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान हिरव्या मिरचीची दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल आवक होते. वाका (गुजरात) येथील खरेदीदार करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून खरेदी करतात.

दिलीप निझरे, ९६०४४८११८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT