Green Chili : मिरची आगार संकटातच

सततच्या पावसामुळे यंदा औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांत विस्तारलेल्या हिरव्या मिरचीच्या आगारावर संकटाचे ढग यंदा गडद झाले आहेत.
Green Chili
Green ChiliAgrowon

औरंगाबद : सततच्या पावसामुळे (Rain) यंदा औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांत विस्तारलेल्या हिरव्या मिरचीच्या (Green Chili) आगारावर संकटाचे ढग यंदा गडद झाले आहेत. पीक संवर्धनासाठी (Crop Conservation) करावयाच्या उपाययोजना प्रतिकूल स्थितीने आणलेला अडथळा मिरची उत्पादनात (green Chili Production) घटीचे प्रमुख कारण बनला आहे.

Green Chili
नगरला ३००० ते ८००० रुपये हिरवी मिरची प्रती क्विंटल

औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील सिल्लोड, भोकरदन व जाफराबाद हे तीन तालुके हिरव्या मिरचीचे आगार बनले आहेत. यापैकी सिल्लोड तालुक्यात ३३०९ हेक्टर, भोकरदन तालुक्यात ४३५१ हेक्टर, तर जाफराबाद तालुक्यात १४७० हेक्टरवर मिरची पीक आहे. या तीनही तालुक्यांत साधारणतः एप्रिलपासून जूनपर्यंत तीन टप्प्यात दरवर्षी हिरव्या व ढोबळ्या मिरचीची लागवड केली जाते. यंदा जूनच्या मध्यानंतर तसेच जुलैच्या सुरवातीपासून सतत पडणाऱ्या पावसाने या एप्रिल व मे मध्ये लागवड झालेल्या मिरची पिकाला संकटात ढकलण्याचे काम केले आहे. सुरवातीच्या दोन टप्प्यातील लागवड केलेली मिरची दोन, तीन किंवा अपवादात्मक ठिकाणी चार तोड्यातच संपली आहे.

Green Chili
Fertilizer : ब्रॅण्डेड कंपनीचे खत, तरी सिमला मिरची काही वाढेना

हंगाम साधारणतः ८ ते ९ महिने चालणे अपेक्षित असताना तो ३ ते ४ महिन्यातच संपत चालल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सुरुवातीला लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नसल्याची स्थिती आहे. बांगलादेश, कोलकता, इंदोर, मुंबई, वाशी, जबलपूर, हैदराबाद, दिल्ली आदी ठिकाणचे व्यापारी वा त्यांचे स्थानिक प्रतिनिधींमार्फत दररोज साधारणतः दुपारनंतर सायंकाळपर्यंत तिन्ही तालुक्यांत मिरचीची खरेदी केली जाते.

उत्पादनात घट; दरात तेजी

नैसर्गिक आपत्तीमुळे सिल्लोड तालुक्यातील जवळपास निम्मे प्लॉट खराब झाले तर उत्पादनातही मोठी घट आली आहे. सुरुवातीला ४००० पासून ७००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले. मध्यंतरी १५०० ते २५०० च्या दरम्यान दर होते. आता ते पुन्हा वधारत आहेत. सिल्लोडमधील गोळेगाव शिवना, आमठाणा येथील केंद्रावर साधारणतः १२ ते १५ ट्रक मिरची खरेदी होते. तर पिंपळगाव रेणुकाई केंद्रावर २ ते सव्वादोन लाख क्विंटल मिरची खरेदी केली जाते. आठवडाभरात जाफराबाद केंद्रावर २६ ते ६० रुपये प्रतिकिलो, पिंपळगाव रेणुगाई येथे ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो तर सिल्लोड तालुक्यातील केंद्रावर २६ ते ४५ किलो प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांच्या अर्थकारणात जवळपास आठ ते दहा वर्षांपासून मिरची पीक महत्त्वाचे आहे. संकटे आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्ञानेश्वर बरधे, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड.
सततच्या पावसाने यंदा मिरची पिकावरील संकट वाढले आहे. ढोबळी मिरचीचे पीक तर संपल्यात जमा आहे.
रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन.
यंदा ढोबळी मिरचीचा प्लॉट नैसर्गिक आपत्तीला बळी पडला. मिरचीत सड वाढली. तीन तोडे झाले. त्याला १८ ते ३२ रुपयापर्यंत प्रति किलोला दर मिळाला. यंदा अपेक्षित उत्पादन नाही.
अमोल बावस्कर, मिरची उत्पादक, लिहाखेडी, ता. सिल्लोड.
यंदा दोन एकर पिकातून आतापर्यंत ७० क्विंटल उत्पादन झाले. त्याला साधारणतः १८ ते ३८ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. उत्पादन खर्च वाढला, उत्पादन घटले. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल नाही व प्लॉट संपले.
विजय दौड, पानवडोद, ता. सिल्लोड.
तीन तोड्यात ६० क्विंटल उत्पादन झाले व प्लॉट संपला. ओला करपा, मूळकूज वापसा नसणे यामुळे मिरची उत्पादक यंदा संकटात आहेत.
शरद सवडे, मिरची उत्पादक, नांदखेड, ता. जाफराबाद.
सध्या मार्केटमध्ये मिरची आवक वाढली आहे. भावही तेजीत आहेत. सध्या बांगला देशाची बॉर्डर बंद आहे. चार दिवसांत बॉर्डर सुरू झाली तरी मिरची तेजीतच राहील.
प्रीतम बेराड, व्यापारी, पिंपळगाव रेणुकाई, जि. जालना.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com