
चाकण : ‘‘येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात रविवारी (ता. ४) बुलडाणा जिल्ह्यातून सुमारे पंधरा टनांवर हिरव्या मिरचीची आवक (Green Chili Arrival) झाली. हिरव्या मिरचीचे भाव (Green Chili Rate) गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा रुपयांनी घसरले. मिरचीला बाजारात (Green Chili Market) ५० रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. तर टोमॅटोचे भाव (Tomato Rate) पंधरा रुपयांनी एका किलोमागे वाढले आहेत,’’ अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.
टोमॅटोला घाऊक बाजारात प्रति किलोला पंचवीस रुपये भाव मिळाला. गेल्या आठवड्यात टोमॅटोचे भाव निचांकी झाले होते. दहा रुपये प्रति किलोने टोमॅटो विकला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. टोमॅटो हा पुणे जिल्ह्यातील स्थानिक परिसरातून विक्रीसाठी येत आहे. टोमॅटोची मागणी वाढलेली असली तरी त्याचे भाव वाढत आहेत.
स्थानिक हिरवी मिरची पावसाने संपलेली आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातून तसेच पुणे जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची आवक चाकण येथील बाजारात होत नाही. सध्या बाजारात मिरचीची बुलडाणा जिल्हा तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून आवक होत आहे.
बाजारात कोकण, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा, मावळ या परिसरातून व्यापारी, किरकोळ विक्रेते फळभाज्या खरेदी करण्यासाठी येतात. बाजारात सध्या गणेशोत्सवामुळे फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. काही फळभाज्यांच्या भावात थोडी घसरण होत आहे, असे व्यापारी रवींद्र बोराटे यांनी सांगितले. या वेळी कुमार गोरे, भानुदास टेंगले, आबा गोरे लहू कोळेकर, गणेश झगडे आदी उपस्थित होते.
पावसामुळे फळभाज्यांची आवक मंदावली
फळभाज्यांची आवक स्थानिक परिसरातून अत्यल्प प्रमाणात होत आहे.पावसाने राज्यात मोठा फटका शेती पिकाला दिल्याने फळभाज्यांची आवक ही मंदावली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळभाज्यांच्या भावात थोडी घसरण होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे फळभाज्यांची आवक मंदावत आहे असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.