Silk Farming Agrowon
यशोगाथा

Silk Farming : अल्पभूधारक कुटुंबाने विणले रेशीम शेतीतून प्रगतीचे धागे

केवळ अडीच एकर शेती असलेल्या बोरी (जि. परभणी) येथील कंठाळे कुटुंबाने रेशीम शेतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत तयार केला आहे. दोन भावांच्या संयुक्त कुटुंबातील सर्व सदस्य राबत असल्याने त्यांच्या श्रमांतून व्यवसायाची उन्नती झाली आहे.

माणिक रासवे

अवर्षण, अतिवृष्टी (Heavy Rain), गारपीट (Hailstorm), तापमान वाढ (Temperature) आदी नैसर्गिक संकटांचा (Natural Calamity) परिणाम अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक बसतो आहे. मात्र खचून न जाता पूरक व्यवसायांमधून पर्यायी आर्थिक स्रोत निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. परभणी जिल्ह्याबाबत बोलायचे, तर अनेक तरुण शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. अनुभवातून कसब अवगत झाल्यामुळे कोष उत्पादनात (Silk Cocoon Production) सुधारणा करत आहेत. दर महिन्याच्या पगाराप्रमाणे शाश्‍वत उत्पन्न त्यांना मिळत आहे.

कंठाळे यांची शेती परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) हे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथील नारायणराव कंठाळे यांची बोरी ते कौसडी रस्त्यालगत गावखरी येथे हलक्या- मध्यम प्रकारची केवळ अडीच एकर शेती आहे. नातेवाइकांची तीन एकर शेती ते करार पद्धतीने करतात. सिंचनासाठी सामाईक विहीर आहे. पाच वर्षांपूर्वीपर्यंत ते हंगामी पिके घेत. गावातच ‘मार्केट’ असल्याने अर्धा ते एक एकरात बारमाही भाजीपाला घेत. चार वर्षांपासून एक एकरावर हळद आहे. नारायणरावांना मोहन आणि शिवानंद असे दोन मुलगे आहेत. थोरले मोहन सलूनचा व्यवसाय सांभाळत शेतीही पाहतात.

धाकटे शिवानंद परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पतसंस्थेत वस्सा येथे सचिव आहेत. तेही शेती पाहतात. शेतात वास्तव्यासाठी पक्क्या घराचे बांधकाम केले आहे. नारायणराव, पत्नी सुलोचना, दोन्ही मुलांसह सुना असे कुटुंबातील सर्व सदस्य शेती व पूरक व्यवसायात आपापली जबाबदारी उचलतात. त्यामुळेच व्यवसायात प्रगती करणे शक्य झाले आहे.

रेशीम शेतीची वाट

शेतीत वेगळे करण्याची इच्छा असलेले शिवानंद विविध माध्यमांतून तंत्रज्ञान, पूरक उद्योगांची माहिती घेत असतात. यू-ट्यूबवरील यशोगाथांमधून त्यांना रेशीम शेतीची माहिती मिळाली. परभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता.पूर्णा), सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील यशस्वी रेशीम उत्पादकांच्या भेटी घेतल्या. हा व्यवसाय करायचे नक्की केल्यानंतर २०१७ मध्ये एक एकरावर तुतीच्या व्ही वन जातीची लागवड केली. लागवडीसाठी ‘मनरेगा’ अंतर्गत अनुदान प्रतीक्षेत आहे. शेतातच रेशीम कीटक संगोपनगृह उभारणीचे काम सुरू केले. सन २०१८ मध्ये शिवानंद यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (परभणी) रेशीम संशोधन योजनेतर्फे आयोजित रेशीम शेतीचे प्रशिक्षण घेतले. येथील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांच्याकडून प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती मिळाली. बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील रेशीम उत्पादक राधेश्याम खुडे यांनीही शेतावर येऊन माहिती दिली. त्यातून ज्ञानात मोठी भर पडली. सप्टेंबर मध्ये जालना जिल्ह्यातील चॉकीसेंटर वरून १५० चॉकी खरेदी करून रेशीम कोष उत्पादनाचा श्रीगणेशा केला.

लॉकडाउनचा अनुभव :

कंठाळे एकदा तेलंगणातील जनगाव येथे रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन गेले. ‘लॉकडाउन’मुळे रेल्वे वाहतूक, स्थानिक बाजारपेठ बंद राहिली. कोषांच्या दरात मोठी घसरण झाली. परिणामी वर्षाला केवळ दोन बॅचेस घेतल्या प्रतिकिलो १९० रुपये दर मिळाले. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती बंद केली. कंठाळे यांनीही उत्पादन तात्पुरते बंद केले. पण तुती बागेचे व्यवस्थापन सुरू ठेवले. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पूर्ववत उत्पादन सुरू केले. यंदा (२०२२) पहिल्या प्रति १०० अंडिपुंजांच्या बॅचपासून ८७ किलो कोष मिळाले प्रतिकिलो ३७० रुपये दर मिळाला. दुसरी बॅच १२५ अंडीपुंजाची घेतली असून १०० किलोपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.

शिवानंद कंठाळे ७७६७९७४२८८, ९५५२२८३५३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT