Sonali Pardhi Agrowon
यशोगाथा

Banana Processing Industry : केळी प्रक्रिया उद्योगातून स्वयंपूर्णता

Article by Ganesh Kore : नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील वारूळवाडी (ठाकरवस्ती) मधील सोनाली नितीन पारधी यांनी पती नितीन यांच्यासह शेतमजुरी करीत शेती सांभाळली. याचबरोबरीने गरजेनुसार बाजारपेठेची गरज ओळखून स्वतःचा केळी आणि बटाटा वेफर्स निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला आहे.

गणेश कोरे

Success Story of Banana Industry : सोनालीताईंचे यांचे माहेर नारोडी-लांडेवाडी (ता.आंबेगाव, जि. पुणे). शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या ठाकर समाजातील सोनालींसह तीन बहिणी आणि भावाला वडिलांनी चांगले शिक्षण दिले. सोनाली या अवसरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियंता विषयात शिक्षण घेत असतानाच, त्यांचा विवाह वारूळवाडी (नारायणगाव) येथील नितीन पारधी यांच्याशी झाला.

अर्धवट शिक्षण सुटल्यानंतर सोनालीताई या पती नितीनसह शेत मजुरीवर जाऊ लागल्या. शेतीतील मजुरी कामे करत असतानाच परिसरातील शेतकरी सतीश बनकर यांची २७ एकर शेतीचे व्यवस्थापनही दोघे पाहू लागले.

विक्रीतून मिळाले उद्योजकतेचे धडे

पारधी कुटुंबामध्ये सर्वजण मोलमजुरी करत असताना सोनालीताईंना सतीश बनकर यांच्याकडे उद्योजकतेचे धडे मिळाले. बनकर यांचा अंडी पॅकिंग करून, मॉलमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय होता. अंडी पॅकिंग करण्याची जबाबदारी सोनाली यांच्याकडे होती. अंडी पॅकिंगच्या कामात तरबेज झाल्यानंतर, त्यांनी पॅकिंगसाठी एका वेफर्स कंपनीत काम केले.

या ठिकाणी वेफर्स निर्मिती आणि पॅकिंगचे धडे आत्मसात करत त्यांनी स्वतः वेफर्स उत्पादन करण्याचा विचार पती नितीन यांच्याकडे मांडला. पतीनेही होकार दिल्यावर घरच्या घरी केळी वेफर्स निर्मितीला सुरुवात केली. पहिल्यांदा एक डझन केळीचे वेफर्स तयार केले.

पण हे सर्व वेफर्स काळे पडले. झालेल्या चुका सुधारण्यासाठी सोनालीताईंनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले. तसेच परिसरातील लहान स्तरावरील वेफर्स निर्मिती युनिटला भेट देऊन प्रक्रिया ते विक्री तंत्राचा अभ्यास केला.

कोणतेही उत्पादन सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने दोघांनी पहिल्यांदा परिसरातील वेफर्स निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून वेफर्स आणून स्वतः पॅकिंग करून विक्री सुरू केली. यासाठी भोसरी, रांजणगाव, शिक्रापूर भागांतील हॉटेल, चहा टपरी चालकांकडे वेफर्सचे सॅम्पल देऊन हळूहळू विक्री व्यवसाय वाढवत नेला. यासोबतच वेफर्सच्या व्यावसायिक उत्पादनासाठीच्या यंत्रणेची माहिती घेतली. वर्षभरात विक्रीच्या आलेल्या अनुभवातून स्वतः वेफर्स निर्मितीचा निर्णय घेतला.

वेफर्स निर्मिती उद्योगाला सुरुवात

गेल्या वर्षभरात बाजारपेठेचा सखोल अभ्यास केल्यानंतर एका डझन केळीपासून सुरू केलेला वेफर्स निर्मिती व्यवसायात आता दर आठवड्याला तीन टन केळींवर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया उद्योगासाठी केळीची खरेदी अकलूज, टेंभुर्णी भागांतून केली जाते. साधारण १३ ते १४ रुपये सुट्टी केळी आणि १७ ते १८ रुपये घडातील केळीचा दर असतो. खरेदी दर बाजारपेठेवर अवलंबून असतात.

प्रक्रिया उद्योगामध्ये केळी आणल्यानंतर केळीची साले काढली जातात. थोडा वेळ सुकविल्यानंतर स्लाइस करून मोठ्या कढईत वेफर्स तळले जातात. यानंतर ट्रेमध्ये वेफर्स पसरून त्यावर विविध चवीच्या मसाल्यांच्या वापर करून सॉल्टी, ब्लॅक पेपर, यलो राउंड असा प्रकारचे मसाला वेफर्स तयार केले जातात. विक्रीच्या दृष्टीने १०० ग्रॅम पॅकिंग केले जाते. एका आठवड्यात तीन दिवस प्रक्रिया आणि तीन दिवस पॅकिंग केले जाते. या उद्योगामध्ये दहा महिलांना रोजगार मिळाला आहे.

सोनालीताईंच्या वेफर्स उद्योगाचा पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत समावेश करण्यात आला. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी सूर्यकांत विरणक, कॅनरा बॅंकेच्या नारायणगांव शाखेचे अधिकारी अभिषेक माने यांच्या मार्गदर्शनाने २३ लाखांचे कर्ज सोनालीताईंना उपलब्ध झाले. स्वतःचे सात लाख रुपयांचे भांडवल उभारत त्यांनी ३० लाखांची गुंतवणूक केली आहे.

बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख होण्यासाठी ‘सोनाली वेफर्स’ या नावाने ब्रॅण्ड करून, त्याचे आकर्षक वेष्टण करून पॅकिंग केले जाते. वेफर्सचे वितरण भोसरीपासून बोटा आणि नगर रोडवरील वाघोली, रांजणगाव, शिक्रापूर परिसरात केले जाते. सध्या महिन्याला तीन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च वगळता सध्या आर्थिक ताळमेळ बसत चालला आहे. येत्या काळात बटाटा वेफर्स निर्मितीची सुरुवात करण्यासाठी प्रक्रिया उद्योगामध्ये विविध चाचण्या सुरू आहेत. पुढील महिन्यामध्ये बटाटा वेफर्सचे उत्पादन सुरू करण्याचे नियोजन सोनालीताईंनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT