Self Help Group Agrowon
यशोगाथा

Animal Feed : नरवणेच्या महिलांची पशुखाद्य निर्मितीची ‘भरारी’

Animal Fodder Production : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील नरवणे येथील भरारी स्वयंसाह्यत्ता समूह महिला बचत गटाने भरारी पशुखाद्याची निर्मिती केली आहे. या व्यवसायातून गटातील सर्व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

विकास जाधव 

Production of Animal Feed : माण तालुक्यातील नरवणे हे दुष्काळी गाव आहे. या गावात जलसंधारणाची कामे झाल्याने काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यावर दोन हंगामांत पिके घेता येऊ लागली. भरारी महिला गटातील महिला एकामेकींच्या शेतात जाऊन पैरा पद्धतीने शेती करत होत्या.

त्यामुळे शेतीचा भांडवली खर्च कमी होण्यास मदत होत होती. या महिला सतत एकत्र असल्याने त्यांनी अडचणीच्या काळात एकमेकींना मदत करता यावी, तसेच पैशांची बचत व्हावी यासाठी आपला बचत गट सुरू करण्याचा विचार पुढे आला.

कोरोना येण्यापूर्वी २०१८ मध्ये दमयंती काटकर, तेजश्री काटकर, लक्ष्मी काटकर, नंदा काटकर, गजराबाई काटकर, सुर्वणा काटकर, कौशल्या काटकर, रुचिरा काटकर, पुष्पा काटकर, जयश्री काटकर या दहा महिलांनी एकत्र येत भरारी स्वयंसाह्यत्ता समूह महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीस बचत करणे या एकमेव उद्देशाने गट सुरू केला होता.

दरम्यानच्या काळात कमिन्स इंडिया या कंपनीने या गावात शेतीचा विकास करण्यासाठी ग्रामीण उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत शेतीला उपयुक्त मदत सुरू केली. यामध्ये पिकांचे दर्जेदार बियाणे, मुरघास, गांडूळ खत युनिट, वेगवेगळ्या फळझाडांची रोपे दिली. तसेच या कंपनीने शेतीपूरक व्यवसायासाठी चांगले काम करणाऱ्या, व्यवहार चांगले असलेल्या पुरुष व महिला बचत गटांची निवड केली. यामध्ये पूर्वीच्या चांगल्या कामाच्या जोरावर या महिलांच्या भरारी बचत गटाची निवड झाली.

खाद्य निर्मितीस प्रारंभ

कंपनीने शेतीपूरक व्यवसाय निवडावा, असे सुचविले. गावात सुमारे ४०० च्या वर जनावरे असून, शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या महिलांनी मार्केट व सभोवतालची परिस्थिती यांचा विचार करून पशुखाद्यनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. गटातील महिलांनी २५ ते ३० हजार रुपये काढून ३० बाय १६ पत्र्याचे शेड उभे केले.

कंपनीने या महिलांना जागेवर तीन प्रशिक्षणे उपलब्ध करून दिली. यासाठी लागणाऱ्या मशिनरीसाठी साडेसहा लाख रुपये खर्च केला. महिलांनी स्वतःकडील ३० टक्के रक्कम घातली. उर्वरित रक्कम कंपनीने अनुदान म्हणून दिली. बारामती येथून या व्यवसायासाठीची मशनिरी खरेदी केली. व्यवसायाच्या कच्चा मालासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला.

गटातील सदस्या

अध्यक्षा दमयंती काटकर, सचिव तेजश्री काटकर, सदस्या लक्ष्मी काटकर, नंदा काटकर, गजराबाई काटकर, सुर्वणा काटकर, कौशल्या काटकर, रूचिरा काटकर, पुष्पा काटकर, जयश्री काटकर.

या व्यवसायास दोन वर्षे पूर्ण होऊन तिसरे वर्ष सुरू आहे. या व्यवसायामुळे सर्व महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दर्जेदार कच्चा माल खरेदीवर भर असल्याने चांगले खाद्य तयार होत आहे. याचा दुधाच्या फॅटवरही परिणाम दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. व्यवसाय करण्यासाठी कमिन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची मदत झाली आहे.

- दमयंती काटकर, अध्यक्ष (९९७०२७४३९८)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Transport Technology: जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

SCROLL FOR NEXT