Ganesh Wagh Agrowon
यशोगाथा

Farmer Exporter : निर्यात सुविधा केंद्राद्वारे झाला शेतकरी स्वतः निर्यातदार

Article by Ganesh Kore : गणेश वाघ (नारायणगाव, जि. पुणे) यांनी घरच्या द्राक्ष शेतीला आधुनिक रूप देताना परिसरातील बागायतदारांचाही फायदा होण्यासाठी निर्यात सुविधा केंद्राची उभारणी केली आहे. त्या माध्यमातून हस्ताई शेतकरी कंपनी व द्राक्ष निर्यातीसाठी डेलिसा हा त्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे.

गणेश कोरे

गणेश कोरे

Success Story of Farmer : पुणे जिल्ह्यात जुन्नर, नारायणगाव परिसरात द्राक्षशेती विस्तारली आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वाघ कुटुंब अनेक वर्षांपासून द्राक्ष शेतीत आहे. जुन्या पिढीतील महादेव, प्रकाश आणि मनोहर असे तिघे वाघ बंधू आहेत. महादेव यांचे चिरंजीव गणेश व त्यांचे चुलतभाऊ अमोल आणि मयूर ही कुटुंबाची तरुण पिढी सध्या शेतीची जबाबदारी सांभाळत आहे. पारंपरिक द्राक्ष शेतीला आधुनिकतेची जोड त्यांनी दिली आहे.

कुटुंबाने टप्प्याटप्प्याने विविध वाणांचे निर्यातक्षम उत्पादन घेत या पिकाखालील क्षेत्रही वाढवले आहे. सध्या स्वतःचे ६० एकर, तर कराराने अन्य शेतकऱ्यांकडील ४० एकर असे मिळून १०० एकरांपर्यंत द्राक्षक्षेत्र आहे. रेडग्लोब, जंबो, क्रिमसन, सुपर सोनाका, सुधाकर आदी व्हाइट आणि रंगीत द्राक्षांची त्यांच्याकडे विविधता आहे. पुणे, मुंबईसह दिल्ली, बंगळूर, गुजरात आदी

राज्यांमध्ये स्वतः तर काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत वाघ कुटुंबाने द्राक्षांची विक्री केली आहे. त्यांच्या द्राक्षांची अनेय देशांना निर्यात झाली आहे. मात्र अनेक निर्यातदार त्यांच्याकडून द्राक्षे खरेदी करून स्वतःच्या ब्रॅण्डद्वारे निर्यात करत करून अधिकचा नफा कमवत.

वास्तविक शेतकरी हवामान बदलांच्या संकटाशी सामना करत, नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वाधिक जोखीम घेऊन द्राक्ष बागा सांभाळतात. दर्जेदार उत्पादन घेतात. मग त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांनाच का होऊ नये? त्यासाठी आपण स्वतः निर्यातीत का उतरू नये असे नव्या पिढीतील गणेश यांना वाटून गेले.

निर्यातीतील पाऊल

पाच- सहा वर्षांपूर्वी जुन्नर परिसरातील प्रसिद्ध अभिनव द्राक्ष उत्पादक संघाच्या निर्यात सुविधा केंद्रातून वाघ यांनी आपली द्राक्षे दुबईला निर्यात करण्याचा प्रयत्न केला. आत्मविश्‍वास वाढल्यावर पुढे तीन ते चार वर्षे ही निर्यात सुरू राहिली. त्यातून चांगले उत्पन्न आणि त्याचबरोबर अनुभवदेखील जमा होऊ लागला होता.

त्यातूनच स्वतःचे शीतगृह आणि निर्यात सुविधा केंद्र सुरू केल्यास त्याचा उपयोगस्वतःच्या द्राक्षांबरोबर परिसरातील बागायतदारांनाही होईल असा विचार गणेश यांनी केला.त्यासाठी कंपनी उभारून शेतकऱ्यांना संघटित करण्याची गरज भासली.

शेतकरी कंपनी व सुविधा केंद्र

निर्यात सुविधा केंद्र उभारणीसाठी भांडवल उभारणी आवश्‍यक होती. केंद्र सरकारच्या ‘अपेडा’च्या योजनांतही त्याचा समावेश होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने हस्ताई शेतकरी उत्पादक कंपनीची २०२१ मध्ये स्थापना केली. कंपनीत सर्व कुटुंबीय सदस्यांना समाविष्ट करून घेण्यात आले.

सर्व शासकीय संमती आणि तंत्रज्ञान सहाय्य घेऊन २०२३ मध्ये सुमारे सहा कोटी रूपयांच्या भांडवलातून निर्यात सुविधा केंद्राची उभारणी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. सुमारे २४ हजार चौरस फुटांच्या क्षेत्रफळावर स्वयंचलित यंत्रणेचे केंद्र उभारण्यात आले. यामध्ये निर्जंतुकीकरण, प्रतवारी, प्रीकूलिंग,

पॅकिंग, शितकरण आदी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. एका दिवशी ४० टन द्राक्षांवर प्रक्रिया होऊन ती निर्यात होऊ शकतील अशी क्षमता उभारण्यात आली आहे. यातील शीतगृह २५० टन क्षमतेचे असून, प्रति १० टन अशा दोन चेंबर्सद्वारे २० टन क्षमतेची प्रीकूलिंग यंत्रणा आहे.

सुविधा केंद्रामध्ये विविध कामांसाठी ५० महिलांना प्रत्यक्ष तर सुमारे २५ तरुणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. विविध तंत्रज्ञ, व्यवस्थापनाठी पाच तरूणांना रोजगार मिळाला आहे.

डेलिसा ब्रॅण्ड

निर्यात करताना बाजारपेठेत स्वतःची ओळख तयार करण्यासाठी आपला स्वतःचा डेलिसा हा ब्रॅण्ड गणेश यांनी विकसित केला आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम तेजीत आहे.

परिसरातील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांचा माल घेऊन आपल्यासोबत त्याची निर्यात आखाती देश, युरोप, चीन, मलेशिया आदी देशांत करण्यासाठी गणेश प्रयत्नशील व व्यस्त झाले आहेत. यंदा १५ कंटेनर्स त्यांनी स्व ब्रॅण्डने निर्यात केले आहेत. दररोज १० ते १२ टन मालाची निर्यात होते आहे.

निर्यातदारांनाही फायदा

नारायणगांव परिसरात निर्यातदार द्राक्षे खरेदी करून नाशिक किंवा नवी मुंबई येथे प्रतवारी आणि पॅकिंग करायचे. त्या ठिकाणी कंटेनर भरले जायचे. यामध्ये वेळेचा अपव्यय आणि द्राक्षांची हाताळणी गरजेपेक्षा जास्त होऊन गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत होता.

आता हस्ताई कंपनीच्या केंद्रातच कंटेनर भरले जात असल्याने वाहतूक ताण आणि हाताळणी कमी होऊन खर्चात आणि वेळेत बचत झाल्याचा फायदा निर्यातदारांना झाला आहे. कंपनीच्या निर्यात सुविधा केंद्रामुळे सुमारे १० निर्यातदार जोडले गेले आहेत. आतापर्यंत एकूण मिळून शंभरपर्यंत कंटेनर्सची निर्यात त्यातून शक्य झाल्याचे गणेश म्हणाले.

पुरस्कारांनी सन्मान

गणेश यांचे वडील महादेव आणि चुलते मंडळी द्राक्ष शेती तर चुलतभाऊ सुविधा केंद्र आणि कामगार व्यवस्थापन पाहतात. गणेश विविध देशांतील खरेदीदारांसोबत समन्वय साधतात. महादेव यांना कृषिभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

त्यांचे बंधू प्रकाश यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित शिवनेरी महोत्सवांतर्गत द्राक्ष किंग पुरस्कार मिळाला आहे.

गणेश वाघ, ९५७९६९७०४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT