Chhatrapati Sambhajinagar News: मक्याला केवळ एक हजार ते तेराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २६) दुपारच्या सत्रातील मक्याचा लिलाव अचानक बंद पाडला. तसेच, मकाने भरलेली काही ट्रॅक्टर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील कन्नड-चाळीसगाव रोडवर आडवी उभी करून शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत जोरदार निदर्शने केली..यावर्षी तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड झाल्याने कन्नड बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोमवार वगळता दोन सत्रांत लिलाव होतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केवळ पाच-सहा व्यापाऱ्यांचाच सहभाग असल्याने मक्याला योग्य दर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि त्यामुळे लिलाव बंद पाडण्यात आला. .Onion Market : कांदा कोसळला! संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडला बंद.संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून मक्याने भरलेले ट्रॅक्टर कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर उभे केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक टी. पी. पवार, सहायक फौजदार नासेर पठाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून ट्रॅक्टर पुन्हा लिलावात आणले आणि वाहतूक सुरळीत केली..Udid Market : करमाळा बाजार समितील उडीद लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला; हमीभावाप्रमाणे खरेदी होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.पोलिस बंदोबस्तात लिलावशेतकऱ्यांनी ‘पोलिसांना बोलवा’ असा पवित्रा घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक रंगराव सानप लिलावस्थळी हजर झाले. त्यांच्या उपस्थितीत दुपारचे सत्र सुरू झाले. २१ ‘मावचर’ असलेल्या मक्याला एक हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला..केंद्र सरकारने मक्यासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल शासकीय दर जाहीर केलेला असतानाही कन्नड बाजार समितीत फक्त १,००० ते १,३०० रुपयेच दर मिळत आहेत. म्हणूनच आम्ही लिलाव बंद पाडला.- नितीन बारगळ, शेतकरी.मक्याचे दर हे मावचर, डागी, बिनडागी यावर अवलंबून ठरतात. ज्या शेतकऱ्यांच्या मकाचे मावचर १३ ते १४ असेल, त्यांना निश्चितच दोन हजार ते २१०० रुपये दर मिळत आहे. मनोज राठोड, सभापती, बाजार समिती, कन्नड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.