Smart Village Project : राज्यात ७५ स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज होणार; पाच जिल्ह्यातील गावांचा समावेश, शासन निर्णय जारी
Village Development : सातनवरी (जि. नागपूर) येथे राबविलेल्या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात १० गावे स्मार्ट करण्याची योजना मुख्यमंत्री यांनी जाहीर केली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.