Straw reaper attached to the tractor and trolley to collect the straw attached to it 
यशोगाथा

गव्हाच्या काडापासून भुस्सानिर्मिती

‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. ‘स्ट्रॉ रीपर’द्वारे भुस्सानिर्मिती व पशुखाद्यासाठी त्याचा वापर असा कौशल्यपूर्ण व्यवसाय गाजरवाडी (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी नितीन धुमाळ यांनी सुरू केला आहे.

मुकुंद पिंगळे

‘हार्वेस्टर’द्वारे गहू काढणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहतात. ‘स्ट्रॉ रीपर’द्वारे भुस्सानिर्मिती व पशुखाद्यासाठी त्याचा वापर असा कौशल्यपूर्ण व्यवसाय गाजरवाडी  (जि. नाशिक) येथील युवा शेतकरी नितीन धुमाळ यांनी सुरू केला आहे. हंगामी रोजगारनिर्मितीसह त्यातून चांगली उत्पन्ननिर्मितीही साध्य झाली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील नितीन खंडेराव धुमाळ यांची १३ एकर शेती असून, २०१२ पासून ते पूर्णवेळ शेती करतात. ऊस, कांदा, गहू व भाजीपाला ही त्यांची प्रमुख पिके. घरी ३० वर्षांपासून ट्रॅक्टरचा वापर सुरू होता. निफाड हा गहू उत्पादक तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. सोंगणी, मळणी किचकट असल्याने अलीकडील काळात काढणीसाठी श्रम व वेळ वाचविण्यासाठी शेतकरी ‘हार्वेस्टर’चा वापर करतात. मात्र काढणीपश्‍चात गव्हाचे काड शेतात पडून राहते. यातून जनावरांसाठी पूर्वीसारखा भुसा मिळत नाही. पुढील हंगामासाठी मशागत करतानाही अडचणी येतात. त्यामुळे अनेक जण काड जाळून टाकतात. परिणामी प्रदूषण होते. जमिनीआड न गेल्याने सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त हा घटकही वापरात येत नाही. नितीन यांच्या लक्षात या बाबी आल्या. पशुखाद्य म्हणून वापरात येण्यासाठी गव्हाच्या या काडांपासून भुस्सानिर्मिती करण्याची कल्पना त्यांना उमगली. तशा यंत्राची यू-ट्यूबवर माहिती शोधताना ‘स्ट्रॉ रिपर’ यंत्राबाबत अधिक माहिती झाली. उपलब्धतेसाठी थेट पंजाब गाठले. तीन वर्षांपूर्वी दोन लाख ७० हजार रुपये किंमत असलेले यंत्र शेतापर्यंत आणण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. व्यवसायाचे स्वरूप  नितीन यांनी २०१९ मध्ये व्यवसाय सुरू झाला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून भुस्सा घ्यायचा त्यांना प्रक्रियेत उपलब्ध झालेले गहू दिले जातात. तर ज्या शेतकऱ्यांना भुस्सा करून हवा आहे त्यांच्याकडून एकरी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारले जाते. अर्थात वाहतुकीचे अंतर व इंधन व व्यक्तींची संख्या यावर दर बदलू शकतात.  यंत्राच्या कार्याचे स्वरूप 

  • ट्रॅक्टर (४५ एचपी. क्षमतेचा), त्यामागे रीपर व त्यामागे ट्रॉली असे यंत्राचे स्वरूप.
  • ट्रॉलीच्या वरच्या भागात पत्र्याची पेटी बसवलेली असते. 
  • ‘हार्वेस्टर’द्वारे गव्हाची काढणी जमिनीपासून २०-३० सेंमी अंतरावर होते. उरलेल्या काडाची कापणी रिपरद्वारे होते. त्याची अंतर्गत रचना ‘मिक्सर’ प्रमाणे असते.
  • तयार झालेला भुसा ट्रॉलीमध्ये वाहून नेण्यासाठी मोठा पाइप असतो. 
  • यात काडाबरोबर शिल्लक गव्हाच्या ओंब्याही येतात. त्याचीही मळणी होते. त्यासाठी एक चाळणी त्यात असून त्याद्वारे गव्हाचे दाणे व भुस्सा वेगवेगळे होतात.
  • पशुपालकांकडून मागणी  सन २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. चाराटंचाई होऊन परिसरात उसाचे दर वाढले. येवला, चांदवड, नांदगाव, सिन्नर व नाशिक तालुक्यांत पशुपालकांना जनावरे जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. नितीन यांनी नव्यानेच त्या वेळी व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी अनेकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळविले. त्यातून दूध उत्पादकांसह घोडेपालन करणारेही ग्राहक म्हणून जोडले गेले. भुश्‍शाला मागणी वाढू लागली. आज ५० हून अधिक ग्राहकांचे कायमस्वरूपी जाळे तयार झाले आहे.  मशरूम उत्पादकांकडून पसंती  जिल्ह्यातील मशरूम उत्पादकांना माध्यम म्हणून विविध प्रकारचे तणस व भुस्सा यांची गरज भासते. त्यामुळे नितीन यांना त्यांच्या रूपाने नवे ग्राहक मिळाले आहेत. व्यवसायातील आकडेवारी 

  • प्रति ट्रॉली भुस्सानिर्मिती खर्च- सुमारे २२०० रु. 
  • वाहतूक खर्च- ५०० ते ७०० रु.. (१० ते १२ किलोमीटर अंतरापर्यंत)
  • सरासरी दीड एकरात एक ट्रॉली भुसा उपलब्धता (सुमारे १० क्विंटल) 
  • दोन ड्रायव्हर्ससहित १२ व्यक्तींना रोजगार. 
  • काडाचे मूल्यवर्धन ठरले प्रभावी   भुस्सानिर्मितीमुळे काड पेटवणे व प्रदूषण थांबले.  मशागत करताना अडचण येत नाही.   सेंद्रिय कर्बवाढीसाठी, जमिनीची पाणीधारण क्षमता वाढविण्यासाठीही काड उपयुक्त ठरले. कष्टातून कामाचा विस्तार  गहू काढणी हंगाम ६० ते ७० दिवसांचा असतो. मात्र उन्हाळा सोसत कष्ट उपसावे लागतात. सुमारे दीड एकरात एक ट्रॉली भुस्सा तयार होते. नितीन यांना वडील खंडेराव, मोठे भाऊ अजित यांचीही मदत होते. पूर्वी घरचा ट्रॅक्टर होता. कामाचा पसारा वाढल्याने भाडेतत्त्वावर दोन ट्रॅक्टर घ्यावे लागत. आता भुश्‍शाला असलेली मागणी पाहून आत्मविश्‍वास वाढला. कष्टाने जमवलेल्या भांडवलातून दुसरा ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केली आहे. १६ लाखांचे यांत्रिकीकरण आहे.  व्यवसायाची वैशिष्ट्ये 

  • घरगुती प्रमुख शेतीकामे संपल्यानंतर भुस्सानिर्मिती सुरू.  पाऊस सुरू होण्याच्या आधी विक्री करण्यावर भर
  • काही भुस्सा साठवून मागणीनुसार टप्प्याटप्प्याने विक्री
  • पावसाळ्यात कोरडा चारा महत्त्वाचा. त्यामुळे पशुपालकांकडून कायम मागणी
  • हंगामी सरासरी आठ लाख रुपयांची उलाढाल. 
  • भुस्सानिर्मितीनंतरचे गव्हाचे उर्वरित अवशेष मशागतीला अडचणीचे  नसतात. नांगरणीनंतर ते जमिनीत गाडले जातात. त्यामुळे जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची धूप थांबते. व्यवसाय निर्मितीबरोबर हे नैसर्गिक फायदेही मिळतात.  -नितीन धुमाळ  ९७६३६६६७११

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

    Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

    Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

    Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

    Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

    SCROLL FOR NEXT