Pune News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासाठी ते मोठ्या संख्येने मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले आहेत.सध्या हा मोर्चा जुन्नर मधून पुढे जात शिवनेरी गडावर दाखल झाला असून, किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीची पूजा करून जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थकांनी आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प केला. दरम्यान सतीश देशमुख नावाच्या एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. .जुन्नरमध्ये दमदार स्वागतमनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जुन्नर शहरात पोहोचल्यावर वनविभागाच्या गेस्ट हाऊसवर काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर ते किल्ले शिवनेरीवर गेले, त्यानंतर त्यानी गडावरील शिवाई देवीची पूजा केली. ते गडावरील पवित्र माती कपाळी लावून मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करतील. या प्रसंगी त्यांच्या समर्थनासाठी हजारो मराठा बांधवांनी किल्ले शिवनेरी परिसरात प्रचंड गर्दी केली आहे. मराठा समाजाचा उत्साह आणि एकजूट यावेळी स्पष्ट दिसून येत आहे. .Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना; आरपार लढ्याचा निर्धार.अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागतजुन्नरच्या आधी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याने अहिल्यानगर शहरात प्रवेश केला, तेव्हा तिथेही त्यांचे जंगी स्वागत झाले. नगर शहराच्या शेंडी गावातून मोर्च्याची सुरुवात झाली, जिथे ग्रामस्थांनी फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीने जरांगे यांचे स्वागत केले. .Manoj Jarange Patil: आझाद मैदानात उपोषण करण्यास मनोज जरांगेना मनाई; हायकोर्टाचा निर्णय.विशेष म्हणजे, रात्री १२ वाजता पावसाची रिपरिप सुरू असतानाही हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि जरांगे यांना पाठिंबा दर्शवला. जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत ग्रामस्थांनी आपला उत्साह व्यक्त केला..सरकारशी चर्चेची शक्यता मावळलीजुन्नरमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ येणार असल्याची चर्चा होती. हे मात्र, आता ही भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक थेट मुंबईला पोहोचून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र करतील, अशी शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.