अधिक माहितीसाठी...महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी तार कुंपणाकरिता ९०% पर्यंत अनुदान. वन्य प्राणी आणि चोरीपासून पिकांचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जमिनीच्या आकारानुसार अनुदानाची टक्केवारी बदलते (९०% ते ४०%). शेतकऱ्यांना पंचायत समिती किंवा महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रांमध्ये ओळखपत्र, बँक तपशील, ग्रामपंचायत आणि समितीची मंजुरीपत्रे यांचा समावेश आहे..Pune News: शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण हा उत्तम पर्याय आहे. मात्र त्याचा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबांसाठी अनुदान मिळते..तसेच, एक ते दोन हेक्टर शेतीसाठी ९० टक्के अनुदान, दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी ६० टक्केअनुदान, तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी ५० टक्के अनुदान, तर पाच हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी ४० टक्के अनुदान मिळते. तर, उर्वरित रक्कम अर्जदार शेतकऱ्याने स्वतः भरावी लागेल..Krishi Sanjeevani Horticulture Scheme: सरकारकडून शेतीसाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज.योजनेचा उद्देशही योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करते, नुकसान कमी करून उत्पादन वाढवते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते..शेतकऱ्यांना फायदेतार कुंपणामुळे पिके वन्य प्राण्यांपासून वाचतात आणि पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते.अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.पिके प्राणी व चोरांपासून सुरक्षित राहतात.चांगल्या साहित्यामुळे वारंवार कुंपण बसवण्याची गरज नाही, खर्च कमी कुंपण मजबूत राहते..Poultry Subsidy Scheme: सरकार १०० देशी कोंबड्या खरेदीसाठी देणार ७५ टक्के अनुदान; २०० किलो खाद्यही देणार.योजनेच्या अटीअर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.शेतीचे कायदेशीर मालक असणे किंवा भाडेतत्वावर शेती करणे आवश्यक.अर्जासाठी शेती अतिक्रमणमुक्त असावी.वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी.पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक.ग्राम विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती आवश्यक.आवश्यक कागदपत्रेशेतकरी ओळख क्रमांक (महाडीबीटीसाठी आवश्यक)जात प्रमाणपत्रबँक पासबुक (बँक खात्याशी लिंक असलेले)ग्रामपंचायतीचा दाखलासमितीचा ठरावजर शेतीत एकापेक्षा जास्त मालक असतील, तर इतर मालकांचे संमती पत्र.वन अधिकाऱ्याचा दाखलास्वयंघोषणा पत्र (इतर योजनांचा लाभ घेतला नसल्याचे).अर्ज प्रकियाया योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा.ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध असू शकते, त्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर (https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login) अर्ज करावा. .वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)१. तार कुंपण योजनेत किती टक्के अनुदान मिळते?एक ते दोन हेक्टरसाठी ९०%, तर ५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी ४०%.२. या योजनेसाठी कोण पात्र आहे?महाराष्ट्रातील शेतकरी, कायदेशीर जमीनधारक किंवा भाडेतत्वावरील शेतकरी.३. ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?महाडीबीटी पोर्टलवर (mahadbt.maharashtra.gov.in).४. आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, ग्रामपंचायत दाखला, समिती ठराव, स्वयंघोषणा पत्र.५. योजनेचा उद्देश काय आहे? पिकांचे वन्य प्राणी व चोरांपासून संरक्षण, नुकसान कमी करणे आणि उत्पादन वाढवणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.