डॉ. एन. के. भुते, डॉ. पी. एल. कुलवाल, डॉ. बी. डी. पवारगेल्या काही वर्षांमधील बदलते हवामान, पावसाचा खंड, शिफारसीपेक्षा जास्त नत्र युक्त खतांचा वापर आणि कीडनाशकांचा अतिरीक्त वापरामुळे आलेली प्रतिकारकता, बदलती पीक पद्धती आणि पोषक वातावरण यामुळे फुलकिडीचा कपाशीवर प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. या फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष नुकसान तर होतेच, पण त्यांच्यामाप्रफत ‘टोबॅको स्ट्रिक विषाणचा प्रसारही होतो. त्याच प्रमाणे टीएसव्ही रोगग्रस्त गाजरगवताचे परागकणाद्वारेही टीएसव्ही या रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे कपाशीवरील या विषाणूच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. .टीएसव्ही रोगाची लक्षणेप्रादुर्भावग्रस्त पानावर सुरुवातीला हरीतद्रव्य नाशांमुळे पिवळे डाग किंवा ठिपके दिसतात. नंतर हे डाग पेशींचा नाश झाल्यामुळे जांभळ्या रंगाचे होतात. पानाच्या देठावर पेशीनाश झाल्यामुळे रेषा तयार होतात. यामुळे झाडाला पाते आणि फुले कमी प्रमाणात लागतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने, शेंडे व पाते वाळून जातात..Cotton Disease Management : कपाशीतील आकस्मिक मर व्यवस्थापन.यजमान वनस्पती व विषाणूचा प्रसारटीएसव्ही रोगाच्या विषाणूमध्ये गाजरगवत, चाकवत यासारख्या वनस्पतींमध्येही लक्षणरहित संक्रमण स्थापित करण्याची क्षमता आहे. शेत परिसरात असलेल्या या वनस्पती किंवा तणांवर हा विषाणू तग धरून जिवंत राहतो. त्यांचा प्रथम प्रसार प्रादुर्भावग्रस्त झाडांपासून फुलकिडीद्वारे कपाशीवर होतो. गाजर गवतावरील परागकणांद्वारे अप्रत्यक्षपणे फुलकिड्यांच्या साहाय्याने कपाशीत रोगाचा प्रादुर्भाव होतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शेत, बांध व परिसरातील पर्यायी यजमान वनस्पती विशेषतः गाजरगवतच्या निर्मुलनावर भर द्यावा.पोषक घटक : किमान तापमान, जास्त आर्द्रता आणि पानाचा ओलसरपणा हे या विषाणूसाठी पोषक घटक आहेत..फुलकिडे - टोबॅकोस्ट्रिक विषाणूचा वाहकफुलकिडे अतिशय लहान व नाजूक असतात. त्यांची लांबी १ मि.मी. पेक्षा कमी असून, फिकट पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असतात. सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली असता त्यांच्या पंखांच्या कडा केसाळ दिसतात. फुलकिडीची पिले सूक्ष्म व बिनपंखी असतात.ही कीड प्रामुख्याने पानाच्या मागील बाजूला आढळून येते. प्रौढ फुलकिडे आणि पिले कापसाच्या पानामागील भाग खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. .Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका.प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात, झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पाने द्रोणासारखी व झाड काळपट-तपकिरी दिसतात. फुलकिड्याच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष नुकसान होते. त्याच प्रमाणे फुलकिडीद्वारे टोबॅको स्ट्रिक विषाणू या रोगाचा प्रसार होतो. टीएसव्ही रोगाच्या विषाणूमध्ये गाजर गवतासारख्या तणामध्ये लक्षणरहीत संक्रमण स्थापित करण्याची क्षमता आहे. गाजर गवतावरील परागकण, फुलकिड्याचे प्रौढ आणि पिले या रोगाच्या प्रसारामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात..एकात्मिक व्यवस्थापनटीएसव्ही हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे रोग झाल्यावर उपचार तितके प्रभावी ठरत नाही. अशा स्थितीमध्ये रोगाचा प्रसारच होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यावश्यक ठरते.या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीवरील फुलकिडींचे नियंत्रण करणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे परिसरातील गाजरगवताचे निर्मुलन करावे. यासाठी खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन करता येईल.रोगाचा प्रादुर्भाव असलेली झाडे काढूननष्ट करावीत.शेतातील आणि आजूबाजूच्या बांधावरील पर्यायी यजमान वनस्पती (गाजर गवत, चाकवत) यांचा नायनाट करावा.वेळेवर खुरपणी व कोळपणी करावी. यामुळे तणांचा बंदोबस्ताबरोबरच जमिनीत असलेली फुलकिड्याच्या पिलांची शेवटची अवस्था नष्ट होण्यास मदत होते. ही अवस्था जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते.शिफारशीपेक्षा अधिक नत्रयुक्त खते आणि संप्रेरकाचा वापर टाळावा.सातत्याने पिकाचे निरीक्षण आणि सर्व्हेक्षण करून फुलकीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाचा नियमित आढावा घेत राहावे.रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी एकरी २० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.फुलकिडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशके (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)फ्लोनिकॅमिड (५० डब्ल्युजी) ३ ग्रॅम किंवाडायनोटेफ्यूरॉन (२० एसजी) ३ ग्रॅम किंवाबुप्रोफेझीन (२५ एससी) २० मिलि किंवास्पायनेटोरम (११.७ एससी) ८ मिलि किंवाडायफेनथ्युरॉन (५० डब्ल्यूपी) १२ ग्रॅम.विशेष सूचनावरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहेत.दिलेले प्रमाण हाय व्हॉल्यूम पंपासाठी आहे.एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकांची मिश्रणे करणे किंवा विद्राव्य खते, संप्रेरके मिसळू नयेत.गरजेनुसार पुढील फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशक बदलून घ्यावे.फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५ ते ७ असावा.- डॉ. एन. के. भुते, ७५८८०८२०३३सहायक कीटकशास्त्रज्ञ, कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.