Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र सुमारे २२ टक्क्यांनी घटले आहे. दुसरीकडे या घटनेच्या क्षेत्रावर नैसर्गिक आपत्तीही ओढवली आहे. त्यामुळे घडलेल्या या क्षेत्रात उत्पादनाचे गणितही कोलमडण्याची क्षमता शक्यता नाकारता येत नाही..मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हे तिन्ही जिल्हे कपाशी उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ३४ हजार ७४८.२८ हेक्टर असताना प्रत्यक्षात सुमारे ८ लाख १० हजार ५३८ हेक्टरवरच यंदा कपाशीची लागवड झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ७८.३३ आपके इतकीच आहे..Cotton Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील कापूस पिकाला पावसाची गरज.घटलेली लागवड कपाशी उत्पादक जिल्ह्यातील कापूस उत्पादनाचे गणित बिघडणार हे स्पष्ट आहे. त्यात अलीकडे नैसर्गिक आपत्तीने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून भरच घालण्याचे काम केले आहे. माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे २८ टक्क्यांपर्यंत कपाशीचे क्षेत्र घटले आहे. .Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड आदी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटून कपाशीची जागा मका पिकाने घेतली आहे. जालना जिल्ह्यात हे प्रमाण सुमारे २३ टक्क्यांपर्यंत तर बीड जिल्ह्यात सुमारे २४ टक्क्यांपर्यंत क्षेत्र घटण्याचे प्रमाण आहे. .त्यात आकस्मिक मर सोबतच इतरही कीड-रोगांचे संकट कपाशीच्या मुळावर उठली आहेत. त्यामुळे यंदाच कापूस उत्पादन घटलेल्या क्षेत्रामुळे कमी होणार सोबतच येणारा काळ कपाशीसाठी किती पोषक ठरतो यावरही कापूस उत्पादनाचे गणित अवलंबून असणार आहे..जिल्हानिहाय कपाशीचे सर्वसाधारण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणीछ.संभाजीनगर ३८८५३३.३१ २८१३०४जालना ३२३३२५.६६ २८२८७०बीड ३२३८८९.३१ २४६३६४.आमच्या शिवारात कपाशीचे क्षेत्र सुमारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे. आताच्या घडीला थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. पोषक नसलेले वातावरण पाहता उत्पादनात फटका बसणारी स्पष्ट आहे.दौलत खंबाट, कपाशी उत्पादक, तिडका, ता. सोयगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.