Banana Production Agrowon
यशोगाथा

Banana Farming : काळवडीच्या नवदुर्गेचे शाश्‍वत शेतीचे मॉडेल

Woman Framer : यामुळे उत्पादन खर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत आहे. जमिनीचा पोत सुधारला आहे. पीक चांगले जोमदार आले आहे. त्यामुळे केळीच्या उत्पादनात सुमारे २० टक्केपर्यंत वाढ झाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : विषमुक्त शेतीसाठी शेतकरी नवदुर्गा पुढाकार घेऊ लागल्या आहेत. काळवडी (ता. जुन्नर) येथील नवदुर्गा निलम बेल्हेकर यांनी ‘डेक्कन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी’अंतर्गत शाश्वत शेती फाउंडेशनच्या माध्यमातून ‘दहा ड्रम थेअरी’ प्रयोग ही संकल्पना सुमारे १५० एकर क्षेत्रावर राबविली आहे.

यामुळे उत्पादन खर्चात ५० टक्क्यांपर्यंत बचत आहे. जमिनीचा पोत सुधारला आहे. पीक चांगले जोमदार आले आहे. त्यामुळे केळीच्या उत्पादनात सुमारे २० टक्केपर्यंत वाढ झाली आहे.

काळवडी हे पुणे-नाशिक हायवेपासून १० किलोमीटर पश्चिमेकडे येडगाव धरणाच्या पायथ्याशी वसलेले दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात १६४ हेक्टर क्षेत्र हे बागायती आहे. कमी उत्पादन खर्चात शेतीमाल उत्पादित व्हावा आणि गुणवत्तापूर्ण पीक पद्धती विकसित व्हावी, या साठी संस्थात्मक प्रगती करून शेतकरी उत्पादक समूहाची बेल्हेकर यांनी २०१६ स्थापना केली.

त्या माध्यमातून या समूहाने तालुक्यात क्लस्टर स्वरूपात काम करण्याचे नियोजन केले. या कामी नाशिकमधील ‘सह्याद्री फार्म’चे ‘हॉर्टिकल्चर इन्कुबेशन सेंटर’ व ‘अॅग्रोवन’मार्फत सहकार्य घेऊन कृती कार्यक्रम आखला.

यामध्ये मालाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने केळीसाठी रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज छोट्या स्वरूपात उभारले आहे.

शेतकरी कंपनीद्वारे शितगृहाची साखळी उभारून मालाची विक्री पुणे, मुंबई येथे करण्यात येत आहे. नवदुर्गा बेल्हेकर म्हणाल्या, ‘‘आमच्या कंपनीमार्फत परिसरात १७० शेतकऱ्यांनी सुमारे १५० एकरांवर केळीची लागवड केली. ही सर्व केळी ‘विषमुक्त शेती’ या संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात एकरी ५० हजार रुपयांपर्यंत बचत झाली आहे.’’

‘दहा ड्रम थेअरी’ची संकल्पना अशी...

सुरुवातीला दहा ड्रम घेऊन त्यात ‘ईएम टू’ द्रावण १५० लिटर टाकले जाते

कडुनिंब, करंज, गुळवेल, निरगुडी, शेवगा, पपई, सीताफळ, टणटणी, लसूणघास, बेशरम अशा वनस्पतीचा पाला प्रत्येकी दोन किलो, आले, मिरची प्रत्येकी दोन किलो, लसूण चार किलो, गूळ दोन किलो, ताक दोन लिटर, गोमूत्र दोन लिटर घेऊन दशपर्णी अर्क तयार केला जातो.

अर्काद्वारे कीटकनाशक व बुरशीनाशकाची निर्मिती. त्यानंतर गाळून घेऊन पिकांवर फवारणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT