Indian Politics: बिहारचे ज्येष्ठ नेते आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी गुरुवारी एका भव्य सोहळ्यात दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाटण्यातील गांधी मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएतील प्रमुख नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.